रविवार, ५ ऑगस्ट, २०१८

*प्रकाश देणारा- फॉस्फरस*

◆ अणुक्रमांक १५ आणि अणुभार ३१ असलेल्या फॉस्फरस या मूलद्रव्याचे आवर्तसारणीतील स्थान तिसऱ्या आवर्तनात आणि १५व्या गणात आहे.

◆ फॉस्फरसची एकंदर २३ समस्थानिके आढळत असली (अणुभार २४ ते ४६) तरी ३१ अणुभार किंवा १६ न्यूट्रॉन्स असलेले समस्थानिक वगळता इतर सर्व समस्थानिक किरणोत्सारी आणि अस्थिर आहेत, त्यामुळे फॉस्फरसचे एकच समस्थानिक आहे असे मानले जाते.

◆ फॉस म्हणजे प्रकाश आणि फोरोस म्हणजे देणारा या ग्रीक भाषेतील शब्दांवरून फॉस्फरस या नावाची व्युत्पती झाली. पांढरा फॉस्फरस हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात आला असता मंद प्रकाश देतो म्हणून त्याला फॉस्फरस असे नाव दिले गेले.
https://t.me/targetmpscmh
◆ फॉस्फरसची पांढरा आणि तांबडा ही दोन अपरूपे आढळतात, पण क्रियाशील मूलद्रव्य असल्याने फॉस्फरस निसर्गात मुक्त स्थितीत आढळत नाही. काही खनिजांचा अपवाद वगळता फॉस्फरस, ऑक्सिजनच्या संयुग स्वरूपात आढळतो.

◆ पांढरा फॉस्फरस हा अधातू असून तो घन स्वरूपात असतो. मेणासारखा पृष्ठभाग असलेला हा पदार्थ मऊ असतो.

◆ रासायनिकदृष्टय़ा अतिक्रियाशील असलेल्या पांढऱ्या फॉस्फरसचे सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे तांबडय़ा फॉस्फरसमध्ये रूपांतर होऊ लागते. काही प्रमाणात तांबडय़ा फॉस्फरसच्या मिश्रणामुळे याचा रंग पिवळसर दिसू लागतो आणि म्हणून याला पिवळा फॉस्फरस असेही म्हणतात.

◆ ऑक्सिजनच्या सान्निध्यात मंद हिरवा-निळा प्रकाश देणारा पांढरा फॉस्फरस हवेमध्ये पटकन पेट घेतो. जळणाऱ्या फॉस्फरसचा लसणीसारखा वास येतो.

◆ स्वयंस्फूर्त पेटण्याच्या गुणधर्मामुळे युद्धात वापरल्या जाणाऱ्या दारूगोळ्यामध्ये याचा वापर करतात.

◆ चार अणु एकत्र येऊन पांढऱ्या फॉस्फरसचा एक रेणू तयार होतो. तो P4 असा दर्शविला जातो.

◆ पांढऱ्या फॉस्फरसला ऑक्सिजन-विरहित वातावरणात २५०अंश सेल्सिअसपर्यंत तापविले असता तांबडा फॉस्फरस तयार होतो. पांढऱ्या फॉस्फरसचे अनेक रेणू एकत्र येऊन त्यांची शृंखला तांबडय़ा फॉस्फरसमध्ये तयार होते.

◆ पांढऱ्या फॉस्फरसपेक्षा कमी क्रियाशील असलेला तांबडा फॉस्फरस चटकन पेट घेत नाही. स्फटिकरूपात आढळणाऱ्या पांढऱ्या फॉस्फरसच्या तुलनेत तांबडा फॉस्फरस अस्फटिकी रूपात असतो.

◆ भुताच्या गोष्टींमध्ये आवर्जून असणारा स्मशानातील रात्रीचा पिवळसर प्रकाश आठवतोय? स्मशानातील हाडांमध्ये असणाऱ्या फॉस्फरसची हवेशी होणारी अभिक्रिया हे एक कारण या प्रकाशामागे असू शकते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सौजन्य -

Join https://t.me/targetmpscmh
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

■   जागतिक दिवस   ■

📚
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  06/08/2018  ■
                        वार :-  सोमवार 
         
           ■    दिनविशेष : 06 ऑगस्ट     ■

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                  

            ● जागतिक अण्वस्त्रविरोधी दिन  ●   

             ●   अणुशस्त्र जागृती दिन   ●
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■

● १९१४: पहिले महायुद्ध – सर्बियाने जर्मनीविरुद्ध तर ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.

● १९२६: जेरट्रूड एडर्ले ही इंग्लिश खाडी पोहुन जाणारी पहिली महिला बनली.

● १९४०: सोविएत युनियनने इस्टोनियाचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला.

● १९४५: जपान मधील हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबाँब टाकला. इतिहासात पहिल्यांदा अणुबाँबचा वापर करण्यात आला.

● १९६०: अमेरिकेने घातलेल्या व्यापारबंदीला प्रत्युत्तर म्हणून क्युबाने अमेरिकन बँकांसह सर्व परदेशी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले.

● १९६२: जमैकाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.

● १९९०: कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.

● १९९४: डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्रदान.

● १९९७: कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने ६ बाद ९५२ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. त्यात सनत जयसूर्या याने ३४० धावा केल्या.

● २०१०: भारतातील जम्मू आणि काश्मीर भागात भयानक पूर आला.
https://t.me/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                ■   जन्म/वाढदिवस   ■

● १८०९: इंग्लिश कवी लॉर्ड टेनिसन यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १८९२)

● १८८१: पेनिसिलीन औषधाचे निर्माते नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा पाश्चिम स्कॉटलंड येथील लॉकफील्डफार्म येथे जन्म. (मृत्यू: ११ मार्च १९५५)

● १९००: टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स कंपनी चे सहसंस्थापक सीसिल हॉवर्ड ग्रीन यांचा जन्म. (मृत्यू: ११ एप्रिल २००३)

● १९२५: लेखिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ नोव्हेंबर २००५)

● १९५९: भारतीय पर्यावरणवादी राजेंद्र सिंग यांचा जन्म.

● १९६५: भारतीय चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा जन्म.

● १९७०: भारतीय वंशाचे अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक एम. नाईट श्यामलन यांचा जन्म.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■

● १९२५: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक , राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १८४८)

● १९६५: संगीतकार वसंत पवार यांचे निधन.

● १९९१: ईराणचे ७४ वे पंतप्रधान शापूर बख्तियार यांचे निधन. (जन्म: २६ जून १९१४)

● १९९७: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १९२४)

● १९९९: केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते कल्पनाथ राय यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९४१ – सेमरी जमालपूर, माऊ, उत्तर प्रदेश)

● २००१: भारतीय नौदल प्रमुख आधार कुमार चॅटर्जी  यांचे निधन.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▂▂▂▂▂▂सौजन्य -*Today in History*📚
Join https://t.me/targetmpscmh ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂