चालु घडामोडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चालु घडामोडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ७ एप्रिल, २०१८

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८, ऑस्ट्रेलिया

#Commonwealth_games

📌 भारताच्या पदकांचा भार वेटलिफ्टर्सवर, ➡️वेंकट राहुल रगालाने पटकावलं चौथं सुवर्णपदक

📌 राष्ट्रकुल खेळांच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये भारताच्या वेटलिफ्टर्सनी दमदार कामगिरी केल्यानंतर तिसऱ्या दिवसाच्या खेळाकडे सर्व क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे.

📌 सध्या भारताच्या खात्यात २ सुवर्ण, १  रौप्य आणि १ कांस्यपदक जमा आहे.

📌 महत्वाची गोष्ट म्हणजे ही चारही पदक भारताला वेटलिफ्टींग प्रकारात मिळालेली आहेत. गुरुराजा, मीराबाई चानू, संजिता चानू आणि दिपक लाथेर यांनी पदकांची कमाई केली आहे.

गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

चानू ठरली सुवर्णकन्या! ४८ किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक

✅  राष्ट्रकुल स्पर्धा २०१८

➡️ भारताची मीराबाई चानू ठरली सुवर्णकन्या! ४८ किलो वजनी गटात पटकावलं पदक

📌ऑस्ट्रेलियातील ✅गोल्ड कोस्ट येथे २१ व्या राष्ट्रकुल खेळांना सुरुवात झालेली आहे.

📌कालच्या दिवशी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यानंतर पहिल्या दिवसाच्या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी संमिश्र कामगिरी केली आहे.

📌 मीराबाईने आपल्या नावावर असलेला राष्ट्रकुल स्पर्धेचा विक्रम मोडीत काढला

📌 पहिल्या दिवशीच्या खेळात भारताला सुवर्णपदक, ४८ किलो वजनीगटात मीराबाईने पटकावलं सुवर्णपदक

शनिवार, २४ मार्च, २०१८

चिनाब नदीवरील सर्वात उंच पूल लवकरच सेवेत

📌 नजर पोहोचणार नाही अशी खोल दरी आणि ती कापत तब्बल ३५९ मीटर उंचीवरून ताशी ८० किलोमीटरच्या वेगाने धावणारी ट्रेन.

📌 उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पात जगातील सर्वात उंच पूल चिनाब नदीवर बांधण्यात येत असून त्याचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे.

📌 उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वेकडून उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्प केला जात आहे.

📌 पुलाची लांबी १३१५ मीटर असून पुलाची उंची ३५० मीटर आहे. १३१५ मीटर लांबीपैकी ७०० मीटर लांबीचे काम पूर्ण झाल्याची माहिती रेल लिंक प्रकल्पाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अनुराग साचन यांनी दिली.

📌 पुलाची लांबी १३१५ मीटर असून पुलाची उंची ३५० मीटर आहे.

📌 आयफेल टॉवरची उंची ही ▶️ ३२४ मीटर आहे. तर चिनाब नदीवर बनविला जाणारा पूल हा ३५९ मीटर उंच आहे

बुधवार, २१ मार्च, २०१८

‘आयुष्मान भारत’ला मंजुरी

📌 देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला प्रतिवर्षी पाच लाख रुपयांचे आरोग्यविमा कवच देणाऱ्या ‘आयुष्मान भारत’ योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.

📌 केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती.

📌 या योजनेचा लाभ दारिद्रय़ रेषेखालील दहा कोटी कुटुंबांना होणार आहे. आता राष्ट्रीय स्वास्थ्य विमायोजना आणि ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना या योजना आता ‘आयुष्मान भारत’मध्येच समाविष्ट होणार आहेत.

📌  या योजनेनुसार रुग्णालयात दाखल करण्याआधीचा आणि नंतरचा खर्च दिला जाणार आहे.

📌 ग्रामीण भागांत जे कुटुंब एकाच खोलीत राहाते आणि त्या खोलीच्या भिंती आणि छप्पर कच्चे आहे, ज्या कुटुंबात १६ ते ५९ या वयोगटातील कुणीही नाही, ज्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून अपंगावरच जबाबदारी आहे असे कुटुंब.

📌 अशा कुटुंब प्रमुखाची जबाबदारी स्त्री पार पाडत असेल असे कुटुंब, अनुसूचित जाती व जमातीचे कुटुंब आणि मजुरीवर पोट भरणारे कुटुंब; यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

शुक्रवार, १६ मार्च, २०१८

आशियाई क्रॉस कंट्री शर्यत

✅ महाराष्ट्राच्या संजीवनीला कांस्यपदक

📌 महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रॉस कंट्री शर्यतीत भारताला ✅कांस्यपदक जिंकून दिले. 

📌 सांघिक गटातही भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 

📌 चीनच्या ✔️ली डॅनने २८ मिनिटे ०३ सेकंदासह सुवर्ण आणि जपानच्या ✔️अ‍ॅबे युकारीने २८ मिनिटे, ०६ सेकंदांसह रौप्यपदक जिंकले
  

मंगळवार, ६ मार्च, २०१८

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा ▶️भारताला सुवर्णपदक

    📌 सुवर्णपदक ✅ मनु भाकरने

▶️दोन वेळा विश्वविजेती राहिलेली यजमान देशाची अलेक्झांड्रा जावाला हिला नमवून भारतीय नेमबाज मनू भाकर हिने ✅मेक्सिकोतील गुआदालाजरा येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सोमवारी दहा मीटर एअर पिस्तुलचे सुवर्ण जिंकले.

▶️ त्याचवेळी पुरुष गटात✅ रवी कुमारला कांस्यवर समाधान मानावे लागले.

▶️२४ शॉटच्या अंतिम लढतीत मनूने २३७.५ गुणांची कमाई केली. जावालाने २३७.१ गुण मिळविले. फ्रान्सची सेव्हिले गोबरविले हिने ✅कांस्य पदक मिळविले.

▶️अकरावीला शिकणाºया मनूने अलीकडेच २०१८ च्या ब्यूनस आयर्स युवा आॅलिम्पिकसाठी कोटा प्राप्त केला.

▶️आता सुवर्ण जिंकून तिने सत्रातील पहिल्या विश्वचषकात देशासाठी शानदार कामगिरी केली आहे.

▶️ याआधी रवी कुमार याने पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत कांस्य पदक जिंकून विश्वचषकात स्वत:च्या पदकाचे खाते उघडले.

▶️जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला✅ इस्तवान पेनी याने २४९.५ गुणांसह सुवर्ण तसेच आॅस्ट्रियाचा ✅अलेक्झांडर शिर्मिल याने २४८.७ गुणांसह रौप्यची कमाई केली.

▶️ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 📌शाहजर रिझवी आणि 📌जीतू राय यांनी पुरुषांच्या दहा मीटर पिस्तुल प्रकारात क्रमश:✅ सुवर्ण आणि✅ कांस्य पदक जिंकले होते.

▶️ 📌 मेहुली घोष हिने महिलांच्या ➡️दहा मीटर एअर रायफल प्रकारात✅ कांस्य पदकाची कमाई केली होती. 

सोमवार, ५ मार्च, २०१८

ऑस्करवर ‘द शेप ऑफ वॉटरचा’ दबदबा

✅यंदा सर्वोत्कृष्ट चित्रपटसाठीच्या ऑस्करवर कोरलं गेलं ‘द शेप ऑफ वॉटर’चं नाव

✅९० व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी) ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

✅आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या गॅरी ओल्डमॅन (डार्केस्ट हावर)ला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मानाचा ऑस्कर

✅सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा यंदाचा ऑस्कर पुरस्कार ‘शेप ऑफ वॉटर’च्या खात्यात.

✅ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली

✅सर्वोत्कृष्ट संगीत- रिमेंमबर मी (कोको)

✅सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत विभागातील पुरस्कारावर कोरलं गेलं ‘शेप ऑफ वॉटर’चं नाव. अलेक्झँडर डेस्प्लॅट यांनी मानले सर्वांचे आभार

✅केआला सेटलच्या परफॉर्मन्सला कलाकारांनी दिलं स्टँडिंग ओव्हेशन

✅सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठीचा मानाचा ऑस्कर ‘ब्लेड रनर 2049’या चित्रपटाच्या खात्यात

✅सर्वोत्कृष्ट पटकथा (ओरिजिनल) या ऑस्कर पुरस्कारावर कोरलं गेलं जॉर्डन पीलेचं नाव. ‘गेट आउट’ चित्रपटासाठी मिळाला पुरस्कार

✅सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड)- ‘कॉल मी बॉय युवर नेम’, जेन्म आयव्हरीचा पहिला ऑस्कर पुरस्कार

✅लैंगिक शोषणाविरोधात ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये कलाकारांनी उठवला आवाज, म्हणाले ‘टाईम्स अप’

✅सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्टचा ऑस्कर ‘द सायलंट चाइल्ड’च्या खात्यात

✅सर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेंट्रीसाठीचा पुरस्कार ‘हेवन इज अ ट्रॅफिक जॅम ऑन द 405’

✅चाहत्यांना जिम्मी किम्मेलने दिलं सरप्राईज. चित्रपटगृहात जाऊन चित्रपटाचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांची भेट घेत त्यांना दिला आश्चर्याचा धक्का.

✅डंकर्क’साठी ली स्मिथने स्वीकारला सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंगचा ऑस्कर

✅सर्वोत्कृष्ट वीएफएक्ससाठीचा ऑस्कर ‘ब्लेड रनर 2049’च्या खात्यात

✅सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट- कोको.

✅सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट- डियर
बास्केटबॉल

✅सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री म्हणून ऑस्करवर कोरलं गेलं अॅलिसन जेनीचं नाव, चित्रपट (आय, टोन्या)

✅सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटासाठीचा ऑस्कर ‘अ फॅन्टॅस्टिक वुमन’च्या खात्यात

✅पुरस्कार प्रदान करतेवेळी होणारा गोंधळ टाळण्यासाठी सेलिब्रिटींना देण्यात येणाऱ्या बंद पाकिटांवर पुरस्कार विभागांची नावं मोठ्या आणि ठळक अक्षरांमध्ये लिहिण्यात आली आहेत.

कृष्णाकुमारी पाकमधील पहिल्या ▶️हिंदू महिला सिनेटर

▶️मुस्लिमबहुल राष्ट्र असणार्‍या पाकिस्तानमध्ये पहिल्या हिंदू महिला सिनेटर म्हणून कृष्णाकुमारी कोहली यांना मान मिळाला आहे.

▶️ त्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) सदस्या आहेत. तालिबानशी निगडित असणार्‍या एका मौलानाचा त्यांनी निवडणुकीत पराभव केला आहे.

▶️कृष्णाकुमारी कोहली यांचा हा विजय म्हणजे पाकिस्तानमधील अल्पसंख्याक समुदायासाठीच्या अधिकारांना मिळालेला न्याय आहे.

▶️ शिवाय पाकिस्तानमध्ये विविध क्षेत्रात पुढे येऊ पाहणार्‍या महिलांसाठी त्या प्रेरणा ठरल्या आहेत.

▶️कोहली या सिंध प्रांतातील थारमधील नगरपारकर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 1979 मध्ये एका गरीब कुटुंबात झाला. 9 वीत असतानाच त्यांचा विवाह झाला.

▶️मात्र, विवाहानंतरही त्यांनी आपले शिक्षण कायम ठेवून सिंध विद्यापीठातून समाजशास्त्र विषयाची पदव्युत्तर पदवी घेतली. 

रविवार, ११ फेब्रुवारी, २०१८

विदर्भातील पहिले फुलपाखरू उद्यान

▪️वनविभागाने तयार केलेल्या विदर्भातील पहिल्या फुलपाखरू उद्यानाचे उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

▪️ ताडोबा मार्गावर या सुरेख उद्यानाची निर्मिती करण्यात आल्याने पर्यटकांना वाघ बघण्यासोबतच या उद्यानातही आनंद लुटता येणार आहे. 

▪️विदर्भातील पहिले बटरफ्लाय गार्डन म्हणजे फुलपाखरू उद्यान चंद्रपूर वनविभागाने निर्माण केले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रोजगार आणि वनसंशोधकांसाठी या उपक्रमाला मूर्त रुप दिले आहे.

▪️आज त्यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन होऊन पर्यटकांसाठी ते खुले करण्यात आले. विविध फुलझाडांनी सजलेले हे उद्यान ताडोबात येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्वणीच असणार आहे.

▪️जंगलालगत निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे उद्यान पर्यटकांना घटकाभर विश्रांतीचे समाधानही देणार आहे. यासोबतच बच्चे कंपनीसाठी खेळणी, सेल्फी प्वॉर्इंट्स, झुलता पूल, अशी काही आकर्षणे येथे आहेत.

▪️मुनगंटीवारांनी या उद्यानात फेरफटका मारत सेल्फीचाही आनंद घेतला. केवळ वाघच नाही, तर निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद पर्यटकांना घेता यावा. तो त्यांना येथे घेता येईल. यासाठीच या उद्यानाची निर्मिती केल्याचे मुनगंटीवारांनी यावेळी सांगितले.

▪️चंद्रपूर-ताडोबा मार्गावरील आगरझरी या गावात हे उद्यानात आहे. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांना यातून रोजगार मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. पर्यटक गावात थांबणार असल्याने विविध घटकांना याचा लाभ मिळेल. यामुळे गावकरीही या उद्यानामुळे आनंदी झाले आहेत. 

▪️या उद्यानाचे संचालन संयुक्त वनव्यवस्थापन समिती करणार आहे. त्यामुळे येथील उपहारगृह, विविध वस्तूंची दुकाने यांच्यामार्फतच चालवली जाणार आहेत. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यात हे उद्यान साह्यभूत ठरणार आहे.

t.me/spardhavishwa

बौद्धिक संपदा निर्देशांक : भारत 44 व्या स्थानी

▪️आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा (इंटेलेक्‍च्युअल प्रॉपर्टी) संबंधी जगभरातील 50 देशांच्या निर्देशांकामध्ये भारताचा 44 वा क्रमांक लागला आहे.

▪️या निर्देशांकातील क्रमवारीमध्ये सुधारणा करण्यासाठी भारताला अधिक अर्थपूर्ण धोरण राबवावे लागणार आहे, असे अमेरिकेच्या चेंबर ऑफ कॉमर्सने आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे.

▪️ गेल्यावर्षी 45 देशांच्या या क्रमवारीमध्ये भारताचा क्रमांक 43 वा होता. या क्रमवारीमध्ये भारताच्या कामगिरीमध्ये सुधारणा झाली असली तरी अजूनही तळाच्या आकडेवारीमध्येच भारताची गणना होते आहे.

▪️या निर्देशांकाच्या पाचव्या आवृत्तीमध्ये भारताच्या सर्वसाधारण गुण 25 टक्‍के (35 पैकी 8.75) होते. तर सहाव्या आवृत्तीमध्ये हे गुण 30 टक्के (40 पैकी 12.3) इतके वाढलेले होते. “ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटर’च्या वार्षिक अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

▪️या क्रमवारीमध्ये अमेरिकेने 37.98 गुण मिळवून पहिला तर 37.97 गुण मिळवून इंग्लंडने दुसरा क्रमांक मिळवला आहे.

t.me/spardhavishwa

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०१८

अंडर 19 क्रिकेट विश्व कप, 2018

विजेता: भारत
ऑस्ट्रेलिया को 8 विकेट से हराकर।

● मैन ऑफ द सीरीज: शुभमन गिल
● मैन ऑफ द मैच: मनजोत कालरा
● भारतीय टीम कप्तान: पृथ्वी शॉ

मैच न्यूज़ीलैंड में खेला गया।

भारत, विजेता
2000, 2008, 2012, 2018

मालदीवमध्ये १५ दिवसांची आणीबाणी घोषित

सर्वोच्च न्यायालय आणि सरकार यांच्यातील तणाव पराकोटीला
मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी देशात १५ दिवसांची आणीबाणी घोषित केली असल्याचे त्यांच्या सहकारी मंत्री अझिमा शुकूर यांनी सोमवारी सरकारी दूरचित्रवाहिनीवर जाहीर केले.

यामुळे या देशातील राजकीय संकट आणखी गडद झाले आहे. या निर्णयामुळे सुरक्षा दलांना संशयितांना अटक करण्याचे आणि स्थानबद्ध ठेवण्याचे अमर्याद अधिकार मिळाले आहेत.

_सर्वोच्च न्यायालय आणि सरकार यांच्यातील तणावाचे संबंध पराकोटीला पोहचले असताना ही घडामोड घडली आहे.

_जगभरातून दबाव वाढत असतानाही राजकीय कैद्यांची सुटका करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास अध्यक्षांनी नकार दिला आहे.

_न्यायाधीशांनी त्यांचा निर्णय फिरवावा असे आवाहन करणारी तीन पत्रे अध्यक्षांनी त्यांना लिहिल्यानंतर काही वेळातच शकूर यांनी सरकारी दूरचित्रवाहिनीवर आणीबाणीची घोषणा वाचून दाखवली.

_ यामीन यांनी आणीबाणी जाहीर करण्याची ही दुसरी वेळ आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये त्यांच्या कथित हत्येचा प्रयत्न झाल्यानंतर त्यांनी हेच पाऊल उचलले होते.

_देशाच्या घटनेनुसार अध्यक्षांनी आणीबाणीबाबतच्या निर्णयाची माहिती दोन दिवसांत संसदेला देणे आवश्यक आहे, मात्र अधिकाऱ्यांनी संसद बेमुदत स्थगित केली आहे.

_मालदीवमधील ताज्या घडामोडींबाबत भारताने चिंता व्यक्त केली असून, नागरिकांनी आवश्यक नसल्यास त्या देशात प्रवास करू नये असे आवाहन केले आहे.

_भारतातून मालदीवमध्ये स्थलांतरित झालेल्या भारतीयांनी सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी, तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणे टाळावे, अशा सूचना परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.

_ मालदीवमधील राजकीय घडामोडी आणि त्यातून उद्भवलेली कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हा सरकारसाठी चिंतेचा विषय आहे.

_त्यामुळे अत्यंत आवश्यक असल्याशिवाय भारतीय नागरिकांनी मालेला जाणे रहित करावे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८

पुण्याची श्रुती श्रीखंडे ‘सीडीएस’ परीक्षेत देशात पहिली

>केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) परीक्षेत पुण्याची श्रुती विनोद श्रीखंडे मुलींमध्ये देशात पहिली आली आहे.

>श्रुती ही ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची कन्या असून पुण्यातील आयएलएस कॉलेजची ती विद्यार्थिनी आहे.

>केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेसचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून तोंडी आणि लेखी परीक्षेचा यात समावेश असतो.

>चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये (ओटीए) तिला प्रवेश मिळणार आहे. @spardhavishwa

>सीडीएसमध्ये लेखी परीक्षा व मुलाखत हे दोन टप्पे असले तरी शारीरिक क्षमता हा तितकाच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचा भाग आहे.

>त्यामुळे श्रुतीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे. एप्रिल २०१८ पासून तिच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे.  तिचे शालेय शिक्षण आर्मी पब्लिक स्कूलमधून झाले आहे. 

>शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या १०७ व्या तुकडीसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. चेन्नईत नॉन टेक्निकल कोर्ससाठी श्रुतीची निवड झाली.

>देशभरातील फक्त २३२ विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मुलांमध्ये निपूर्ण दत्ता देशात पहिला आला आहे.

सोमवार, २९ जानेवारी, २०१८

सर्वेश नावंदेला सर्वोत्कृष्ट कॅडेटचे सुवर्णपदक

📕

🎯नवी दिल्ली : पुण्यातील सर्वेश नावंदेला वायूदल विंगच्या सर्वोत्कृष्ट कॅडेटचे सुवर्णपदक मिळाले आहे.

🎯'पंतप्रधान रॅली'त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्वेशला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

🎯एसीसीच्या श्रेणी अंतर्गत सर्वेश सुभाष नावंदेला वायुदल विंगचा सर्वोत्कृष्ट कॅडेट होण्याचा बहुमान मिळाला.

🎯सर्वेश 19 वर्षांचा असून पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये बी.एस.सीच्या द्वितीय वर्षाला शिकत आहे.

🎯 प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी सहभागी होण्यासाठी त्याने पुण्यातून नाव नोंदवलं होतं. नोव्हेंबरमध्ये पुणे विभागातून त्याची निवड औरंगाबादमधील पुढील शिबीरासाठी झाली.

🎯यानंतर एनसीसी शिबीरामध्ये होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये तो उत्तीर्ण होत गेला आणि पंतप्रधान रॅलीसाठी पात्र ठरला.

🎯दिल्लीतील छावणी भागातील करीअप्पा परेड ग्राउंडवर नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी पंतप्रधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

🎯या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कॅडेट्सना पुरस्कार वितरण करण्यात आले.

🎯 यावेळी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत, वायुसेना प्रमुख बिरेंद्रसिंग धनोआ, नौसेना प्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा उपस्थित होते

रविवार, २१ जानेवारी, २०१८

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर        🗂_गोदावरी गौरव पुरस्कार_


🎯कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने एक वर्षांआड ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार देण्यात येतो.

🎯या पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

🎯यंदा पुरस्काराचे १३ वे वर्ष असून लोकसेवा, संगीत-नृत्य, चित्रपट-नाटय़, ज्ञान-विज्ञान, क्रिडा-साहस, चित्र-शिल्प या क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या मान्यवरांना सन्मानित करण्यात येते.

🎯२१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

🗂 पुरस्कारासाठी निवड झालेले मान्यवर

1 )अमोल पालेकर
2) सत्यशील देशपांडे
3 ) डॉ. रवींद्र कोल्हे
4) स्मिता कोल्हे
5) सुभाष अवचट
6) डॉ. स्नेहलता देशमुख
7) सुदर्शन शिंदे
8) महेश साबळे

T.me/spardhavishwa

शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८

सात सर्वोच्च शिखरांवर तिरंगा फडकाविला

> अंटार्क्‍टिका खंडातील माउंट व्हिन्सन हे शिखर सर करून भारतीय हवाई दल ही प्रत्येक खंडातील सर्वांत उंच शिखर सर करणारी पहिली संस्था ठरली आहे

>माउंट व्हिन्सनची उंची १६,०५० फूट असून, ते जगातील सर्वाधिक दुर्गम भागातील शिखर आहे. 

>हवाई दलाच्या पथकाने केलेल्या या कामगिरीबद्दल हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

>व्हिन्सन मोहिमेचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन आर. सी. त्रिपाठी यांनी केले. ‘अंटार्क्‍टिका हा खंड आमच्यासाठी नवा आणि आव्हानात्मक असला तरी त्यासाठी पूर्ण तयारी केली होती.

>आमचा आत्मविश्‍वास प्रबळ होता. शंभर किमी वेगाने अतिथंड वारे वाहत असताना आम्ही तीन दिवसांत शिखर सर केले,’ असे त्रिपाठी म्हणाले. 

>इतर सहा खंडांमधील शिखरांवर तिरंगा फडकाविण्याचा मानही त्यांनी पटकाविला होता. 

>माउंट व्हिन्सनच्या आधी हवाई दलाने नेपाळमधील माउंट एव्हरेस्ट, इंडोनेशियातील माउंट कार्स्टन्झ पिरॅमिड, रशियामधील माउंट एलब्रुस, दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजारो, अर्जेंटिनातील माउंट अकोन्काग्वा आणि अलास्कामधील माऊंट मॅककिनले ही शिखरे यशस्वीपणे सर केली आहेत.

T.me/spardhavishwa

शनिवार, ६ जानेवारी, २०१८

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस 🇮🇳बेटावरील जिल्हा

📕गिनीज वर्ल्ड रेकॉड्सच्या निकषांनुसार आसाम या राज्यातील ब्रम्हपुत्रा नदीवरील ‘माजुली’ बेट हे जगातील सर्वात मोठे नदीवरील बेट ठरले आहे.

📕या आधी क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असणा-या ब्रझिलच्या ‘माराजी’ बेटास मागे टाकून माजुली बेटाने हा विक्रम नोंदवला आहे.

📕आसाममधील ब्रम्हपुत्रा नदीमध्ये हे बेट आहे. माजोलीचा अर्थ होतो की दोन समांतर नद्यांमधला प्रदेश.

📕बेटाच्या उत्तरेस ब्रम्हपुत्रेची उपनदी सुबानसिरी आहे. दक्षिणेस ब्रम्हपुत्रा आणि खेरकानिया, सुली या नद्या आहेत.

📕ब्रह्मपुत्रा व तिच्या उपनद्या विशेषतः लोहित यांनी मार्ग बदल्याने हे बेट निर्माण झाले आहे. बेटावर १४४ खेड्यांमध्ये दीड लाखाच्या वर लोकसंख्या वास्तव्यास आहे.( @spardhavishwa  )

📕बेटावर १४४ खेड्यांमध्ये दीड लाखाच्या वर लोकसंख्या वास्तव्यास आहे. माजुली बेट हे दुर्मीळ पक्षी, पाणी व वनस्पतींचे ठिकाण आहे. स्थलांतरित पक्ष्यांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या बेटास जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी युनोस्कोने नामनिर्देशित केले होते.

बुधवार, ३ जानेवारी, २०१८

राज्य सरकार स्थापणार ‘निसर्ग पर्यटन विकास मंडळ’


📕राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील निसर्ग पर्यटनास चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

📕या मंडळाच्या माध्यमातून राज्यातील ४८ अभयारण्ये, ६ राष्ट्रीय उद्याने आणि ५८ वन्यजीव संरक्षित क्षेत्रांचा विकास केला जाणार आहे.

📕या मंडळाचे मुख्यालय नागपूर येथे वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राहाणार आहे.

📕राज्यातील विविध वन्यजीव क्षेत्राला दरवर्षी सुमारे १० लाख पर्यटक भेट देतात. (@spardhavishwa )

📕परंतु तेथे पर्यटकांसाठी मुलभूत पायाभूत सुविधा नसल्याने क्षमता असूनही पर्यटक मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ आदी राज्यांना पसंती देतात.

📕व्यावसायिक दृष्टिकोण ठेवून या क्षेत्राचा विकास केला तर भविष्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते त्यामुळे यासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.