- ‘दीया मिर्जा’ संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण दूत
अभिनेत्री दीया मिर्जाची संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पर्यावरण दूत म्हणून निवड करण्यात आली आहे. भारतातील ‘वाइल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया’ची देखील दिया ब्रँड अॅबेसिडर आहे. भारतात पर्यावरण आणि वन्य प्राण्यासांठी दिया मिर्जा काम करते.
संयुक्त राष्ट्रसंघाने पर्यावरण दूत म्हणून निवड केल्यानंतर दिया म्हणाली की,‘पर्यावरण संरक्षण आणि चिरंतनविकासाला चालना देण्यासाठी मला संयुक्त राष्ट्रसंघासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. ही माझ्यासाठी मोठ्या सन्मानाची आणि मला प्रेरणा देणारी गोष्ट आहे.सध्याच्या काळतीलपर्यावरणाच्या वाढत्या समस्या हे एकआव्हान आहे. आपण पर्यावरणाचेसंरक्षण एकत्र मिळून करू, या कामातसहभाग होण्यासाठी लोकांना प्रोत्साहीतकरेन’ असेही दीया म्हणाली.
‘दिल्लीतील वायू प्रदुषणामुळे नारिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या भारताला पर्यावरणाच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी, पर्यावरण जागृतीसाठी आणि निरोगी भविष्याकरता दिया काम करेल.’, असे संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण क्षेत्राचे प्रमुखईरीक सोलेहीम म्हणाले.