रविवार, ११ फेब्रुवारी, २०१८

विदर्भातील पहिले फुलपाखरू उद्यान

▪️वनविभागाने तयार केलेल्या विदर्भातील पहिल्या फुलपाखरू उद्यानाचे उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

▪️ ताडोबा मार्गावर या सुरेख उद्यानाची निर्मिती करण्यात आल्याने पर्यटकांना वाघ बघण्यासोबतच या उद्यानातही आनंद लुटता येणार आहे. 

▪️विदर्भातील पहिले बटरफ्लाय गार्डन म्हणजे फुलपाखरू उद्यान चंद्रपूर वनविभागाने निर्माण केले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रोजगार आणि वनसंशोधकांसाठी या उपक्रमाला मूर्त रुप दिले आहे.

▪️आज त्यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन होऊन पर्यटकांसाठी ते खुले करण्यात आले. विविध फुलझाडांनी सजलेले हे उद्यान ताडोबात येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्वणीच असणार आहे.

▪️जंगलालगत निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे उद्यान पर्यटकांना घटकाभर विश्रांतीचे समाधानही देणार आहे. यासोबतच बच्चे कंपनीसाठी खेळणी, सेल्फी प्वॉर्इंट्स, झुलता पूल, अशी काही आकर्षणे येथे आहेत.

▪️मुनगंटीवारांनी या उद्यानात फेरफटका मारत सेल्फीचाही आनंद घेतला. केवळ वाघच नाही, तर निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद पर्यटकांना घेता यावा. तो त्यांना येथे घेता येईल. यासाठीच या उद्यानाची निर्मिती केल्याचे मुनगंटीवारांनी यावेळी सांगितले.

▪️चंद्रपूर-ताडोबा मार्गावरील आगरझरी या गावात हे उद्यानात आहे. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांना यातून रोजगार मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. पर्यटक गावात थांबणार असल्याने विविध घटकांना याचा लाभ मिळेल. यामुळे गावकरीही या उद्यानामुळे आनंदी झाले आहेत. 

▪️या उद्यानाचे संचालन संयुक्त वनव्यवस्थापन समिती करणार आहे. त्यामुळे येथील उपहारगृह, विविध वस्तूंची दुकाने यांच्यामार्फतच चालवली जाणार आहेत. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यात हे उद्यान साह्यभूत ठरणार आहे.

t.me/spardhavishwa

बौद्धिक संपदा निर्देशांक : भारत 44 व्या स्थानी

▪️आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा (इंटेलेक्‍च्युअल प्रॉपर्टी) संबंधी जगभरातील 50 देशांच्या निर्देशांकामध्ये भारताचा 44 वा क्रमांक लागला आहे.

▪️या निर्देशांकातील क्रमवारीमध्ये सुधारणा करण्यासाठी भारताला अधिक अर्थपूर्ण धोरण राबवावे लागणार आहे, असे अमेरिकेच्या चेंबर ऑफ कॉमर्सने आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे.

▪️ गेल्यावर्षी 45 देशांच्या या क्रमवारीमध्ये भारताचा क्रमांक 43 वा होता. या क्रमवारीमध्ये भारताच्या कामगिरीमध्ये सुधारणा झाली असली तरी अजूनही तळाच्या आकडेवारीमध्येच भारताची गणना होते आहे.

▪️या निर्देशांकाच्या पाचव्या आवृत्तीमध्ये भारताच्या सर्वसाधारण गुण 25 टक्‍के (35 पैकी 8.75) होते. तर सहाव्या आवृत्तीमध्ये हे गुण 30 टक्के (40 पैकी 12.3) इतके वाढलेले होते. “ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटर’च्या वार्षिक अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

▪️या क्रमवारीमध्ये अमेरिकेने 37.98 गुण मिळवून पहिला तर 37.97 गुण मिळवून इंग्लंडने दुसरा क्रमांक मिळवला आहे.

t.me/spardhavishwa

बुधवार, ७ फेब्रुवारी, २०१८

डिजिटल सोन्याची खाण    (बिटकोईन)

_उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांवर मानवाने त्या त्या काळाशी सुसंगत अशा तंत्रज्ञानाचा शोध लावला.

_काहीवेळा हे शोध मुद्दाम लावले गेले तर अनेकदा चुकून. मानवी इतिहासातील सर्वात मोठे आणि त्याचं जीवन बदलवून टाकणारे शोध कुठले, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देणे खरोखरच कठीण असेल.

_प्रागैतिहासिक मानवाला जेव्हा शेतीचा शोध लागला त्यानंतर तो स्थिर झाला. शिकार करून जनावरांसारखे जगणे मागे पडत गेले आणि सिव्हिलायझेशनला सुरुवात झाली.

_जसा प्रागैतिहासिक मानवासाठी शेतीचा शोध अद्भुत तसाच आगीचा, चाकाचा, ऊर्जेचा, विजेचा आणि इतर अनेक तत्सम जिनसा आणि संकल्पनांचा.

_ मानवाची उत्क्रांती आणि तंत्रज्ञानाची क्रांती या एकमेकांना पूरक अशाच झालेल्या आहेत. काही शोध हे काळाच्या फार पुढे नेणारे असतात.

_डिजिटायझेशन हा त्यातलाच एक प्रकार. आणि त्याचे ताजे पिल्लू म्हणजे बिटकॉईन.

_अर्थात बिटकॉईन हे काही फार ताजे उदाहरण नाही. पण या महिन्याच्या सुरुवातीला त्याचा इतका बोलबाला झाला की बिटकॉईन हेच जगातील अंतिम सत्य असल्यासारखा सारा माहौल झाला होता.

_ त्याच्या आर्थिक गणितांकडे काणाडोळा केला तर या संपूर्ण यंत्रणेमागचे तंत्रज्ञान खरोखरच अफाट आहे.

_त्या तंत्रज्ञानामुळेच देशोदेशीच्या वित्तीय संस्थांनी बिटकॉईनला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

_सातोशी नाकामोतो नावाच्या व्यक्तीने एक अल्गोरिदम तयार केला असं म्हणतात. या अल्गोरिदमच्या आधारावर ही आभासी चलनाची (व्हच्र्युअल क्रीप्टोकरन्सी) टांकसाळ कार्यरत आहे.
_ज्या प्रमाणे सोने, पेट्रोल किंवा इतर मौल्यवान खनिजे मर्यादित संख्येतच तयार होतात, त्याप्रमाणे बिटकॉईनची सुद्धा मर्यादा ठरवलेली आहे.

_या अल्गोरिदमनुसार २ अब्ज १० कोटी इतके बिटकॉईन्सच व्यवहारात येऊ  शकतील. त्यापुढे जर का ती तयार करायची असतील तर अल्गोरिदमच्या भागांना डिकोड करावे लागेल.

_ म्हणजेच त्या अल्गोरिदमच्या भागांची उत्तरे शोधावी लागतील. पूर्वी जसे लोक सोन्याच्या खाणी शोधत तसेच या अल्गोरिदमची उत्तरे शोधणाऱ्या लोकांना माइनर्स म्हणतात. बरं हा अल्गोरिदम म्हणजे अत्यंत गुंतागुंतीचे आणि भयंकर किचकट असे एक प्रकारचे गणितच असते.

_ नवीन बिटकॉईन्स तयार करणे म्हणजे ही उत्तरे शोधणे. जेव्हा एखाद्या माइनरला नवीन उत्तर सापडते तेव्हा त्याच्या खात्यामध्ये काही बिटकॉईन्स जमा होतात. त्यासाठी मुळात खाते असावे लागते. सारे व्यवहार या खात्यामधून.

_हे खाते तयार करण्यासाठी एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर डाऊनलोड करायचे आणि त्यासोबतच ब्लॉकचेनही. ही ब्लॉकचेन म्हणजे खातेवही किंवा पासबुक.

_ या ब्लॉकचेनची साइज ही साधारण ६-७ जीबी इतकी असते. डाऊनलोड-इन्स्टॉलेशन झाल्यावर माइनरला एक खातेक्रमांक मिळतो.
t.me/spardhavishwa

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०१८

बजेट ऐकायचंय? मग या संज्ञा तुम्हाला माहिती असल्याच पाहिजेत


_केंद्रीय अर्थसंकल्पाचे भाषण इंग्रजीमध्ये असल्यामुळे बहुतांशवेळा त्यातील शब्द आपल्याला माहिती नसतात. किंवा अनेकवेळा इंग्रजी संज्ञा सहजगत्या वापरल्या जात असल्या तरी त्यांचा मराठी अर्थ आपल्याला माहिती नसतो. पण या संज्ञांची माहिती आजच करुन घेतली तर उद्या अर्थसंकल्पीय भाषण ऐकणं सोपं होऊन जाईल._

💰युनियन बजेट - याचा शब्दशः अर्थ संघराज्याचा अर्थसंकल्प. भारत सरकारने आपल्या सर्व उत्पन्न स्रोतातून प्राप्त झालेल्या पैशाची दिलेली माहिती आणि येत्या आर्थिक वर्षामध्ये कोणत्या प्रकारे निधीचा खर्च होईल याचा लेखाजोखा या अर्थसंकल्पामध्ये मांडलेला असतो.

💰 डायरेक्ट-इनडायरेक्ट टॅक्स* - प्रत्यक्ष कर म्हणजे जो थेट व्यक्ती आणि संस्थांना भरावा लागतो. आयकर, कार्पोरेट कर प्रत्यक्ष कर आहेत. अप्रत्यक्ष कर म्हणजे जो वस्तू आणि सेवांवर लादला जातो. एखादी वस्तू किंवा सेवा घेताना ग्राहकाद्वारे भरला जाणारा कर म्हणजे अप्रत्यक्ष कर. यामध्ये अबकारी कर सीमाशुल्क कर यांचा समावेश होतो.

💰जीएसटी* - वस्तू आणि सेवा यांच्या पुरवठ्यावर लादण्यात आलेला कोणताही कर म्हणजे वस्तू-सेवा कर अशी जीएसटीची व्याख्या करण्यात आली आहे. यामध्ये मानवी उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या अल्कोहोलला वगळण्यात आले आहे. 'गुडस्' म्हणजे वस्तू यामध्ये पैसे वगळता कोणतीही चल संपत्ती, पिकं यांचा समावेश होतो. सर्विस या संज्ञेमध्ये वस्तू, पैसा वगळून सर्व सेवांचा समावेश होतो.

💰 कस्टम्स ड्युटी* -  हा कर देशातून निर्यात होणाऱ्या आणि आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर लावला जातो. हा कर त्या वस्तूला आयात करणारा किंवा निर्यात करणारा व्यक्ती भरत असतो. बहुतांशवेळा त्याचा भार वस्तू खरेदी करणाऱ्या व्यक्तीवर टाकला जातो.

💰 फिस्कल डेफिसिट* - म्हणजे वित्तिय तूट. वित्तीय तूट म्हणजे सरकारपाशी अपेक्षित असलेला कर्जवगळता निधी(Budgeted Receipts) आणि अंदाजलेला खर्च (Budgeted Expenditure) यांच्यातील फरक म्हणजे वित्तीय तूट होय. फिसकल डेफिसिट याचा मराठीत अर्थ वित्तीय तूट असा आहे. जेव्हा एकूण खर्च "नॉन बॉरोड रिसिट' म्हणजे कर्जाशिवाय इतर जमेहून अधिक होतो, तेव्हा त्या तुटीला वित्तीय तूट म्हणतात. वित्तीय तूट भरून काढायला सरकारला जनतेकडून नवीन कर्ज घ्यावे लागते.

💰 रेवेन्यू डेफिसिट* -  महसुली उत्पन्नातून महसुली खर्च वजा केल्यास महसुली तुट समजते. महसुली तूट म्हणजे महसुली उत्पन्न वजा महसुली खर्च होय. महसुली उत्पन्नात सरकारचे निव्वळ कर आणि करोत्तर उत्पन्न याचा समावेश होतो. तर महसुली खर्चात योजना खर्च व योजना-बाह्य खर्च यांचा समावेश होतो.

💰 प्रायमरी डेफिसिट* -  वित्तिय तुटीतून कर्जावर द्यावे लागणारे व्याज वगळल्यास प्रायमरी डेफिसिट.

💰फिस्कल पॉलिसी* -  म्हणजे वित्तिय धोरण. महसूल उत्पन्न आणि खर्च याबाबत सरकारचा एकूण दृष्टीकोन यामध्ये अपेक्षित आहे.

💰फायनान्स बिल - म्हणजे अर्थविधेयक. अर्थसंकल्प मांडल्यावर तात्काळ हे विधेयक मांडले जाते. अर्थसंकल्पात सुचवलेले कर, त्यांचे नियोजन यामध्ये सुधारणा किंवा बदल याबाबत सर्व माहिती यात असते.

💰डिसइनव्हेस्टमेंट  - सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि महामंडळांचे सरकारकडे असलेले समभाग विकून त्यातून निधीची निर्मिती करणे म्हणजे निर्गुंतवणूक होय.

आतापर्यंतच्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतच्या महत्वाच्या गोष्टी

●केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली 1 फेब्रुवारीला 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. मात्र 1999 सालापूर्वी संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प मांडला जायचा. इंग्रजांनी भारतासाठी अर्थसंकल्प मांडण्याची सुरूवात केली, त्यावेळी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ संध्याकाळी 5 वाजताची ठरवण्यात आली होती.

●मात्र 1999मध्ये एनडीए सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ बदलून सकाळी 11 वाजताची केली. 1992पासून भारतात अर्थसंकल्प टीव्हीवर प्रक्षेपित करण्यात येऊ लागला.

अर्थसंकल्पासंदर्भातील अशाच काही गोष्टी....

- स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून आर. के. षण्मुखम चेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

- स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 साली मांडण्यात आला. 15 ऑगस्ट 1947 पासून ते 31 मार्च 1948 पर्यंत या कालावधीसाठीचा हा अर्थसंकल्प होता. 

- 1950  मध्ये प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांनी हा अर्थसंकल्प मांडला होता. 

- 1955-56 च्या अर्थसंकल्पाचे सर्व दस्तावेज पहिल्यांदा हिंदी भाषेत छापण्यात आले होते. यापूर्वी दस्तावेज इंग्रजी भाषेतच छापण्यात येत होते.  

- मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंह, विश्वनाथ प्रताप सिंह आणि मनमोहन सिंह या चार माजी पंतप्रधानांनी अर्थमंत्रिपदाचीही धुरा सांभाळली आहे.

- स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून आर. के. षण्मुखम चेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

- स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 साली मांडण्यात आला. 15 ऑगस्ट 1947 पासून ते 31 मार्च 1948 पर्यंत या कालावधीसाठीचा हा अर्थसंकल्प होता. 

- 1950  मध्ये प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांनी हा अर्थसंकल्प मांडला होता. 

- 1955-56 च्या अर्थसंकल्पाचे सर्व दस्तावेज पहिल्यांदा हिंदी भाषेत छापण्यात आले होते. यापूर्वी दस्तावेज इंग्रजी भाषेतच छापण्यात येत होते.  

- मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंह, विश्वनाथ प्रताप सिंह आणि मनमोहन सिंह या चार माजी पंतप्रधानांनी अर्थमंत्रिपदाचीही धुरा सांभाळली आहे.

- पंतप्रधानपदी विराजमान असताना जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थमंत्रिपदाची जबाबदारी होती. 

- जवाहरलाल नेहरू यांनी 1958-59 सालचा अर्थसंकल्प मांडला. पुढल्या वर्षी 28 फेब्रुवारीच्या दिवशीच अर्थसंकल्प मांडण्यात येईल, अशी घोषणा त्या दिवशी करण्यात आली.  

-  मोरारजी देसाई यांनी एकूण 10 वेळा अर्थसंकल्प मांडला आहे तर पी. चिदंबरम यांनी 8 वेळा अर्थसंकल्प मांडला आहे. 

- अर्थमंत्री असताना 1991 मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारीकरण धोरणाच्या अंमलबजावणीची घोषणा केली होती. 

- 2017-18 पासून रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्ररित्या सादर  न करता त्याचा सर्वसाधारण अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला. 

भारतातील विविध वृत्तपत्रे व संपादक :

दर्पण - बाळशास्त्री जांभेकर - 6 जानेवारी 1832

 दिग्दर्शन (मासिक) - बाळशास्त्री जांभेकर - 1840

 प्रभाकर (साप्ताहिक) - भाऊ महाराज

 हितेच्छू (साप्ताहिक) - लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख

 काळ (साप्ताहिक) - शी.म.परांजपे

 स्वराज्य पत्र (साप्ताहिक) -
शी.म.परांजपे

 केसरी - लोकमान्य टिळक

 मराठा (इंग्रजी साप्ताहिक) - लोकमान्य टिळक

 दिंनबंधू (साप्ताहिक) - कृष्णाराव भालेकर

 समाज स्वास्थ (मासिक) - रघुनाथ धोंडो कर्वे

 विध्यर्थी (मासिक) - साने गुरुजी
 कॉग्रेस (साप्ताहिक) - साने गुरुजी
 साधना (साप्ताहिक) - साने गुरुजी

 शालापत्रक - कृष्णशास्त्री चिपळूणकर

 उपासना (साप्ताहिक) - वी.रा.शिंदे

 सुबोध पत्रिका - प्रार्थना समाज

 महाराष्ट्र धर्म (मासिक) - आचार्य विनोबा भावे

 मानवी समता -  महर्षी धो. के. कर्वे(समता संघ)

 सुधारक (साप्ताहिक) - आगरकर

 बहिष्कृत भारत (पाक्षिक) - डॉ.
बाबासाहेब आंबेडकर

 मूकनायक (पाक्षिक) -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 जनता (प्रबुध्द भारत) -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 समता -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 मानवता -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 बहिष्कृत मेळा -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 सार्वजनिक सभा (त्रैमासिक) - न्या. महादेव गोविंद रानडे

 इंदुप्रकाश - महादेव गोविंद रानडे

 हिंदुस्थान गदर (साप्ताहिक) - लाला हरदयाळ

 श्रद्धा (साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद

 विजय (साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद  

 अर्जुन (साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद

 सदधर्म प्रचार (उर्दू साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद

 वंदे मातरम - अरविंद घोष

 पंजाबी पिपल्स - लाला लजपतराय

 नॅशनल हेरॉल्ड - पंडित जवाहरलाल नेहरू
 फॉरवर्ड (मासिक) - सुभाषचंद्र बोस

 इंडियन सोशॉलिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा

 रास्त गोफ्तर - दादाभाई नौरोजी

 व्हाईस ऑफ इंडिया -  दादाभाई नौरोजी 

मीना तुपे-चोंधे पाटील (PSI)

@महाराष्ट्राच्या इतिहासातील 'मानाची तलवार' मिळवणारी पहिली महिला पोलिस अधिकारी

मीना भीमसेन तुपे या या एक मराठी पोलीस अधिकारी आहेत. बीड जिल्ह्यातील दगडी शहाजानपुर या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. तुपे यांच्या वडीलांनी त्यांना शिकायला प्रोत्साहित केले, परंतु त्यांच्या आई, शशिकला तुपे यांचा विरोध होता.

तुपे कुटुंबातील चार मुली व एक मुलापैकी  तुपे बहिणींमध्ये मीना सर्वात लहान आहेत. मुलींनी शिक्षणच घेऊ नये असा आईचा आग्रह असल्याने मोठ्या तिन्ही बहिणींचे जेमतेम शालेय शिक्षण झाले.

मीना तुपे यांना लहानपणापासून शेतात नांगरणी, खुरपणी अशी अंगमेहनतीची सर्व कामे करावी लागली त्यामुळे त्या काटक झाल्या. त्यांना शिक्षिका व्हायचे होते. त्यासाठी शिक्षणशास्त्र पदविकाही तिने प्राप्त केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या पोलिसांत भरती झाल्या. त्यांना 💐🏆खंडाळा प्रशिक्षण केंद्रात उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी 🏆म्हणून प्रथम पारितोषिक मिळाले त्या हवालदार झाल्या. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 🎯महिलांमध्ये महाराष्ट्रात द्वितीय क्रमांकाने 💐उत्तीर्ण झाल्या. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत त्यांना ७४९ तरुण-तरुणींमधून 🏆सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी🏆 असल्याचा मान मिळाला. हे मिळविणाऱ्या मीना तुपे पहिल्याच महिला प्रशिक्षणार्थी होत.

💰पुरस्कार💰

मीना तुपे यांना त्यांच्या प्रबोधिनीमधील यशाबद्दल ‘🗡मानाची तलवार’🗡 मिळाली आहे. (९-६-२०१६) 🏅यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक, 🏵अहिल्याबाई होळकर करंडक
🏆🏆🏆
महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या शंभर वर्षांहून अधिकच्या काळात सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा किताब प्रथमच एखाद्या महिलेने प्राप्त करण्याचा इतिहास रचणाऱ्या उपनिरीक्षक मीना तुपेच्या कामगिरीने बीड जिल्ह्य़ातील दगडी शहाजानपुर या छोटय़ाशा गावाचे नाव प्रकाशझोतात आले आहे. मीनाच्या कामगिरीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेला गौरव सोहळा अनुभवताना तिला शिक्षणाला प्रोत्साहन देणारे वडील भिवसेन तुपे आणि कधीकाळी मुलींनी शिकण्याची गरज नाही, अशी अपेक्षा बाळगणारी आई शशिकला या दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
🎯७४९ प्रशिक्षणार्थीच्या तुकडीत सर्वोत्कृष्ट ठरणे सोपी गोष्ट नाही. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी प्रबोधिनीत १३ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण घ्यावे लागते. लहानपणापासून शेतात नांगरणी, खुरपणी अशी अंगमेहनतीची सर्व कामे करणाऱ्या मीनाला हे प्रशिक्षण त्यामुळे खडतर भासलेच नाही. तुपे कुटुंबाची आर्थिक स्थिती तशी बेताचीच. चार एकर कोरडवाडू शेतीवर गुजराण करणाऱ्या या कुटुंबात चार मुली आणि एक मुलगा. बहिणींमध्ये मीना सर्वात लहान. मुलींनी शिक्षणच घेऊ नये असा आईचा आग्रह असल्याने मोठय़ा तिन्ही बहिणींचे जेमतेम शालेय शिक्षण झाले. परंतु, मीनाचा शिक्षणाचा हट्ट कायम राहिला. शिक्षिका होण्याचे तिचे ध्येय होते. त्यासाठी शिक्षणशास्त्र पदविकाही तिने प्राप्त केली. मात्र, शिक्षण पूर्ण होऊनही नोकरीची आशा धूसर वाटत होती. याच काळात पोलीस भरतीची जाहिरात पाहून तिचा निर्णय बदलला. ती हवालदार झाली. खंडाळा प्रशिक्षण केंद्रातही उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून तिने प्रथम पारितोषिकY मिळवले. पण या पदावर तिचे मन रमेना. पोलीस अधिकाऱ्यांच्या कामामुळे मीनाला प्रेरणा मिळाली.
शेतकरी कुटुंबातील युवक-युवतींनी स्पर्धा परीक्षेकडे वळायला हवे. त्यासाठी मार्गदर्शन करण्याची तिची तयारी आहे. मीनाची हुशारी केवळ शारीरिक प्रशिक्षणाच्या बाबतच दिसून येते असे नव्हे. शेतकरी आत्महत्येवरील तिचे विचार सर्वानाच अंतर्मुख करणारे आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर केवळ वरवरची चर्चा करून उपयोग नाही. त्यासाठी काहीतरी खोलवर उपायांची गरज आहे. शेतात राबणाऱ्या आई-वडिलांचे अपार कष्ट लक्षात घेऊन मुलांनी चांगला अभ्यास केल्यास आत्महत्येसारखा प्रश्नच उद्भवणार नाही, असे तिचे म्हणणे आहे. शेतकरी कुटुंबांना यामुळे चांगले दिवस येतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली. सध्याच्या काळात सत्ता व पैसा याला सर्वाधिक महत्व आहे. त्यामुळे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो असा समज आहे. परंतु, कठोर मेहनतीने हा दृष्टिकोन बदलता येतो आणि त्याची ताकत शेतकरी कुटुंबातही आहे. मीना तुपेने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

अंडर 19 क्रिकेट विश्व कप, 2018

विजेता: भारत
ऑस्ट्रेलिया को 8 विकेट से हराकर।

● मैन ऑफ द सीरीज: शुभमन गिल
● मैन ऑफ द मैच: मनजोत कालरा
● भारतीय टीम कप्तान: पृथ्वी शॉ

मैच न्यूज़ीलैंड में खेला गया।

भारत, विजेता
2000, 2008, 2012, 2018

मालदीवमध्ये १५ दिवसांची आणीबाणी घोषित

सर्वोच्च न्यायालय आणि सरकार यांच्यातील तणाव पराकोटीला
मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी देशात १५ दिवसांची आणीबाणी घोषित केली असल्याचे त्यांच्या सहकारी मंत्री अझिमा शुकूर यांनी सोमवारी सरकारी दूरचित्रवाहिनीवर जाहीर केले.

यामुळे या देशातील राजकीय संकट आणखी गडद झाले आहे. या निर्णयामुळे सुरक्षा दलांना संशयितांना अटक करण्याचे आणि स्थानबद्ध ठेवण्याचे अमर्याद अधिकार मिळाले आहेत.

_सर्वोच्च न्यायालय आणि सरकार यांच्यातील तणावाचे संबंध पराकोटीला पोहचले असताना ही घडामोड घडली आहे.

_जगभरातून दबाव वाढत असतानाही राजकीय कैद्यांची सुटका करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास अध्यक्षांनी नकार दिला आहे.

_न्यायाधीशांनी त्यांचा निर्णय फिरवावा असे आवाहन करणारी तीन पत्रे अध्यक्षांनी त्यांना लिहिल्यानंतर काही वेळातच शकूर यांनी सरकारी दूरचित्रवाहिनीवर आणीबाणीची घोषणा वाचून दाखवली.

_ यामीन यांनी आणीबाणी जाहीर करण्याची ही दुसरी वेळ आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये त्यांच्या कथित हत्येचा प्रयत्न झाल्यानंतर त्यांनी हेच पाऊल उचलले होते.

_देशाच्या घटनेनुसार अध्यक्षांनी आणीबाणीबाबतच्या निर्णयाची माहिती दोन दिवसांत संसदेला देणे आवश्यक आहे, मात्र अधिकाऱ्यांनी संसद बेमुदत स्थगित केली आहे.

_मालदीवमधील ताज्या घडामोडींबाबत भारताने चिंता व्यक्त केली असून, नागरिकांनी आवश्यक नसल्यास त्या देशात प्रवास करू नये असे आवाहन केले आहे.

_भारतातून मालदीवमध्ये स्थलांतरित झालेल्या भारतीयांनी सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी, तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणे टाळावे, अशा सूचना परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.

_ मालदीवमधील राजकीय घडामोडी आणि त्यातून उद्भवलेली कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हा सरकारसाठी चिंतेचा विषय आहे.

_त्यामुळे अत्यंत आवश्यक असल्याशिवाय भारतीय नागरिकांनी मालेला जाणे रहित करावे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.