>केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) परीक्षेत पुण्याची श्रुती विनोद श्रीखंडे मुलींमध्ये देशात पहिली आली आहे.
>श्रुती ही ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची कन्या असून पुण्यातील आयएलएस कॉलेजची ती विद्यार्थिनी आहे.
>केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेसचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून तोंडी आणि लेखी परीक्षेचा यात समावेश असतो.
>चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये (ओटीए) तिला प्रवेश मिळणार आहे. @spardhavishwa
>सीडीएसमध्ये लेखी परीक्षा व मुलाखत हे दोन टप्पे असले तरी शारीरिक क्षमता हा तितकाच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचा भाग आहे.
>त्यामुळे श्रुतीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे. एप्रिल २०१८ पासून तिच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. तिचे शालेय शिक्षण आर्मी पब्लिक स्कूलमधून झाले आहे.
>शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या १०७ व्या तुकडीसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. चेन्नईत नॉन टेक्निकल कोर्ससाठी श्रुतीची निवड झाली.
>देशभरातील फक्त २३२ विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मुलांमध्ये निपूर्ण दत्ता देशात पहिला आला आहे.