सोमवार, ५ मार्च, २०१८

कृष्णाकुमारी पाकमधील पहिल्या ▶️हिंदू महिला सिनेटर

▶️मुस्लिमबहुल राष्ट्र असणार्‍या पाकिस्तानमध्ये पहिल्या हिंदू महिला सिनेटर म्हणून कृष्णाकुमारी कोहली यांना मान मिळाला आहे.

▶️ त्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) सदस्या आहेत. तालिबानशी निगडित असणार्‍या एका मौलानाचा त्यांनी निवडणुकीत पराभव केला आहे.

▶️कृष्णाकुमारी कोहली यांचा हा विजय म्हणजे पाकिस्तानमधील अल्पसंख्याक समुदायासाठीच्या अधिकारांना मिळालेला न्याय आहे.

▶️ शिवाय पाकिस्तानमध्ये विविध क्षेत्रात पुढे येऊ पाहणार्‍या महिलांसाठी त्या प्रेरणा ठरल्या आहेत.

▶️कोहली या सिंध प्रांतातील थारमधील नगरपारकर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 1979 मध्ये एका गरीब कुटुंबात झाला. 9 वीत असतानाच त्यांचा विवाह झाला.

▶️मात्र, विवाहानंतरही त्यांनी आपले शिक्षण कायम ठेवून सिंध विद्यापीठातून समाजशास्त्र विषयाची पदव्युत्तर पदवी घेतली.