सोमवार, २९ जानेवारी, २०१८

सर्वेश नावंदेला सर्वोत्कृष्ट कॅडेटचे सुवर्णपदक

📕

🎯नवी दिल्ली : पुण्यातील सर्वेश नावंदेला वायूदल विंगच्या सर्वोत्कृष्ट कॅडेटचे सुवर्णपदक मिळाले आहे.

🎯'पंतप्रधान रॅली'त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्वेशला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

🎯एसीसीच्या श्रेणी अंतर्गत सर्वेश सुभाष नावंदेला वायुदल विंगचा सर्वोत्कृष्ट कॅडेट होण्याचा बहुमान मिळाला.

🎯सर्वेश 19 वर्षांचा असून पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये बी.एस.सीच्या द्वितीय वर्षाला शिकत आहे.

🎯 प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी सहभागी होण्यासाठी त्याने पुण्यातून नाव नोंदवलं होतं. नोव्हेंबरमध्ये पुणे विभागातून त्याची निवड औरंगाबादमधील पुढील शिबीरासाठी झाली.

🎯यानंतर एनसीसी शिबीरामध्ये होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये तो उत्तीर्ण होत गेला आणि पंतप्रधान रॅलीसाठी पात्र ठरला.

🎯दिल्लीतील छावणी भागातील करीअप्पा परेड ग्राउंडवर नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी पंतप्रधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

🎯या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कॅडेट्सना पुरस्कार वितरण करण्यात आले.

🎯 यावेळी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत, वायुसेना प्रमुख बिरेंद्रसिंग धनोआ, नौसेना प्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा उपस्थित होते

रविवार, २१ जानेवारी, २०१८

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर        🗂_गोदावरी गौरव पुरस्कार_


🎯कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने एक वर्षांआड ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार देण्यात येतो.

🎯या पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

🎯यंदा पुरस्काराचे १३ वे वर्ष असून लोकसेवा, संगीत-नृत्य, चित्रपट-नाटय़, ज्ञान-विज्ञान, क्रिडा-साहस, चित्र-शिल्प या क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या मान्यवरांना सन्मानित करण्यात येते.

🎯२१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

🗂 पुरस्कारासाठी निवड झालेले मान्यवर

1 )अमोल पालेकर
2) सत्यशील देशपांडे
3 ) डॉ. रवींद्र कोल्हे
4) स्मिता कोल्हे
5) सुभाष अवचट
6) डॉ. स्नेहलता देशमुख
7) सुदर्शन शिंदे
8) महेश साबळे

T.me/spardhavishwa

शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८

सात सर्वोच्च शिखरांवर तिरंगा फडकाविला

> अंटार्क्‍टिका खंडातील माउंट व्हिन्सन हे शिखर सर करून भारतीय हवाई दल ही प्रत्येक खंडातील सर्वांत उंच शिखर सर करणारी पहिली संस्था ठरली आहे

>माउंट व्हिन्सनची उंची १६,०५० फूट असून, ते जगातील सर्वाधिक दुर्गम भागातील शिखर आहे. 

>हवाई दलाच्या पथकाने केलेल्या या कामगिरीबद्दल हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

>व्हिन्सन मोहिमेचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन आर. सी. त्रिपाठी यांनी केले. ‘अंटार्क्‍टिका हा खंड आमच्यासाठी नवा आणि आव्हानात्मक असला तरी त्यासाठी पूर्ण तयारी केली होती.

>आमचा आत्मविश्‍वास प्रबळ होता. शंभर किमी वेगाने अतिथंड वारे वाहत असताना आम्ही तीन दिवसांत शिखर सर केले,’ असे त्रिपाठी म्हणाले. 

>इतर सहा खंडांमधील शिखरांवर तिरंगा फडकाविण्याचा मानही त्यांनी पटकाविला होता. 

>माउंट व्हिन्सनच्या आधी हवाई दलाने नेपाळमधील माउंट एव्हरेस्ट, इंडोनेशियातील माउंट कार्स्टन्झ पिरॅमिड, रशियामधील माउंट एलब्रुस, दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजारो, अर्जेंटिनातील माउंट अकोन्काग्वा आणि अलास्कामधील माऊंट मॅककिनले ही शिखरे यशस्वीपणे सर केली आहेत.

T.me/spardhavishwa

रविवार, ७ जानेवारी, २०१८

Vijay Gokhale 🇮🇳 Foreign Secretary


📕Vijay Gokhale, the man who will helm India’s diplomacy as Foreign Secretary for the next two years, is known for working “below the radar.”

📕Thus, by the time his appointment was announced on January 1, he had already been at work, quietly, in South Block.

📕The appointment of Mr. Gokhale, a 1981 batch officer, will not rule many feathers as he is the senior­most among his peers.

📕He was in the same batch with India’s High Commissioner to the U.K. Y.K Sinha, and India’s Ambassador to Ja­ pan Sujan Chinoy    

📕within hours, the Palestinian Foreign Ministry announced that they had withdrawn their man in Islamabad and regretted his actions.

📕 As Secretary (Economic Relations) since October, Mr. Gokhale was at several important meetings and dealing with upcoming visits. ( @spardhavishwa )

📕like those of Israeli Prime Minister Benjamin Netanyahu in mid­January, ASEAN leaders at the end of January, and King Abdullah II of Jordan thereafter.

📕When India expressed its anger at the Palestinian envoy to Pakistan’s appearance at a public rally with Hafiz Saeed, it was Mr. Gokhale, whose portfolio includes West Asia and North Africa, who summoned the Palestinian Ambassador in New Delhi.

📕Mr. Gokhale is understood to have conveyed the tough message in his characteristically understated, but effective, manner:

📕 Mr. Gokhale’s reputation for conducting negotiations in Beijing, in tandem with National Security Adviser Ajit Doval and Foreign Secretary S. Jaishankar during the Doklam crisis last year, is also well known, and both Indian and Chinese leaders appreciated his role.

📕Many of Mr. Gokhale’s predecessors have also been China experts: most notably Mr. Jaishankar, Shivshankar Menon and ShyamSaran,

📕but a few have the unifocal
breadth and depth of his skills and experience in handling Beijing.

📕He has had two “desk postings” in New Delhi, as Director (China and East Asia) in the Ministry ofExternal Affairs, and then Joint Secretary (East Asia).
     
     [ Source-_The Hindu ]

शनिवार, ६ जानेवारी, २०१८

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस 🇮🇳बेटावरील जिल्हा

📕गिनीज वर्ल्ड रेकॉड्सच्या निकषांनुसार आसाम या राज्यातील ब्रम्हपुत्रा नदीवरील ‘माजुली’ बेट हे जगातील सर्वात मोठे नदीवरील बेट ठरले आहे.

📕या आधी क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असणा-या ब्रझिलच्या ‘माराजी’ बेटास मागे टाकून माजुली बेटाने हा विक्रम नोंदवला आहे.

📕आसाममधील ब्रम्हपुत्रा नदीमध्ये हे बेट आहे. माजोलीचा अर्थ होतो की दोन समांतर नद्यांमधला प्रदेश.

📕बेटाच्या उत्तरेस ब्रम्हपुत्रेची उपनदी सुबानसिरी आहे. दक्षिणेस ब्रम्हपुत्रा आणि खेरकानिया, सुली या नद्या आहेत.

📕ब्रह्मपुत्रा व तिच्या उपनद्या विशेषतः लोहित यांनी मार्ग बदल्याने हे बेट निर्माण झाले आहे. बेटावर १४४ खेड्यांमध्ये दीड लाखाच्या वर लोकसंख्या वास्तव्यास आहे.( @spardhavishwa  )

📕बेटावर १४४ खेड्यांमध्ये दीड लाखाच्या वर लोकसंख्या वास्तव्यास आहे. माजुली बेट हे दुर्मीळ पक्षी, पाणी व वनस्पतींचे ठिकाण आहे. स्थलांतरित पक्ष्यांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या बेटास जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी युनोस्कोने नामनिर्देशित केले होते.

गुरुवार, ४ जानेवारी, २०१८

जागतिक व्यापार संघटना-

📕एप्रिल १९९४ मध्ये गॅटच्या सदस्य राष्ट्रांनी मोरोक्कोमधील मर्राकेश या ठिकाणी एक करार संमत केला.

📕या मर्राकेश कराराद्वारे गॅटच्या जागी एक नवी संघटना, जागतिक व्यापार संघटना (WTO) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.( @spardhavishwa )

📕त्यानुसार १ जानेवारी १९९५ रोजी WTOची स्थापना करण्यात आली.

📕गॅट ही १९४८पासून जागतिक व्यापाराचे नियमन करणारी तात्पुरत्या स्वरूपाची अनौपचारिक संघटना होती.

📕मात्र WTO ही आंतरराष्ट्रीय कराराने स्थापन करण्यात आलेली कायमस्वरूपी संघटना आहे. WTOचे मुख्यालय जीनिव्हा येथे आहे.

📕गॅट म्हणजे प्रशुल्क व व्यापारविषयक सामान्य करार (General Agreement on Tariff and Trade) हा करार १ जानेवारी १९४८ रोजी कार्यरत झाला.

बुधवार, ३ जानेवारी, २०१८

जगातील महत्वाचे देश


   न्यूझीलंड

📕जगातील सर्वात कमी प्रदूषण असलेला देश अशी तसेच भ्रष्टाचाराचे प्रमाणही सर्वात कमी असलेला देश अशी न्यूझीलंडची ओळख आहे. या देशाबद्दल अधिक जाणून घेणेही मनोरंजक आहे.

📕या देशात एकूण जिवंत प्राण्यांमध्ये माणसांची संख्या केवळ ५ ट्क्के आहे तर बाकी संख्या जनावरांची आहे. असे असले तरी येथे साप नाहीत. समजा एखादा साप दिसलाच तर त्वरीत पोलिसांत त्याची माहिती द्यावी लागते. 

📕या देशात जगातील सर्वात छोट्या आकाराचे डॉल्फिन आहेत. आणि या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे किवी. १९ व्या शतकात येथे डॉल्फिनना समुद्री धोके तसेच खडकांपासून जहाजाचे रक्षण करण्याचे प्रशिक्षण दिले जात असे.

📕येथे लांडगांच्या संख्या नागरिकांच्या संख्येच्या नऊपट आहे. हा जगातील एकमेव असा देश आहे, ज्याची दोन राष्ट्रगीते आहेत.

📕या देशाचा जन्म ८०० वर्षांपूर्वीचा आहे. त्यापूर्वी येथे मानवी वस्ती नव्हती. सर्वात कमी लोकसंख्येचा हा देश असून येथील लेाकसंख्या आहे ४५ लाख.

📕माऊंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले गिर्यारोहक एडमंड हिलरी याच देशाचे होते. तसेच प्लॅस्टीक सर्जरीचा शोध लावणारे हेराल्ड गिल्डेज हेही याच देशाचे नागरिक.

📕या देशातील ब्ल्यू लेक नदीचे पाणी जगातील सर्वात शुद्ध पाणी मानले जाते. १८९३ मध्येच या देशाने महिलांना मतदानाचा अधिकार दिला व असा अधिकार देणारा जगातला हा पहिला देश ठरला.

📕येथे समलैगिक विवाहांना मान्यता आहे. या देशात एकही न्यूकिलअर पॉवर स्टेशन नाही. तसेच तुरूंगातील कैद्यांमध्ये ९६ टक्के पुरूष कैदी आहेत.

📕येथे नाताळ, गुड फ्रायडे, ईस्टर संडे या सणांदिवशी टिव्हीवर जाहिराती दाखविण्यास बंदी आहे.

   (लेखिका_शामला देशपांडे)

प्राचीन भारत स्थापत्य व मंदिर शैली

महाबलीपुरम – भव्य मंदिरांचे शहर 

📕चेन्नईपासून अवघ्या ६० किमी असलेले महाबलीपुरम हे भव्य मंदिरे, स्थापत्य व सुंदर सागरतटासाठी जगभरात प्रसिद्ध अ्रसलेले शहर आहे.

📕बंगाल खाडीच्या तटावर वसलेले हे शहर पूर्वी मामल्लापुरम नावाने ओळखले जात असे. सातव्या शतकातील हे शहर पल्लव राजांच्या राजधानीचे शहर होते.

📕येथील द्रविड शैलीतील वास्तूकला जगभरात प्रसिद्ध असून दरवर्षी येथे शेकडो देशी विदेशी पर्यटक हजेरी लावतात.

📕२७ मीटर लांब व ९ मीटर रूंदीच्या भव्य खडकावर कोरली गेलेली नक्षी येथील एक प्रमुख आकर्षण आहे. अर्जुन पॅलेस नावाने हा खंड ओळखला जातो. या विशाल शिलाखंडावर ईश्वर, मानव, पशु, पक्षी अतिशय सुंदर कोरले गेले आहेत.( @spardhavishwa )

📕समुद्र किनार्‍यावर प्राचीन मंदिर असून ते शेार टेंपल म्हणून ओळखले जाते. आठव्या शतकातील हे मंदिर द्रवीड वास्तूशैलीचा उत्तम नमुना आहे. 

📕हा तीन मंदिरांचा समूह असून मधले मंदिर विष्णुचे आहे तर त्याच्या बाजूने दोन शिवमंदिरे आहेत. येथे समुद्राच्या लाटा येऊन थडकतात.

📕याच भागात महाभारतातील पाच पांडवांच्या नावाचे पाच दगडी रथ आहेत त्यांना पांडव रथ असेच म्हणतात. 

📕पैकी चार रथ अखंड शिळेतून कोरले गेले आहेत. द्रौपदी व अजुर्नाचा रथ चौकोनी आकाराचा आहे. यात धर्मराजाचा रथ सर्वात उंच आहे. 

📕खडकातून कोरून जी मंदिरे देशात बनविली गेली आहेत त्यातील एक येथेही पाहायला मिळते. त्याला कृष्ण मंडप असे म्हणतात.

📕येथील भितींवर ग्रामीण जीवनाची झलक पाहायला मिळते तसेच गोवर्धन पर्वत उचललेल्या कृष्णाचे कोरीव शिल्पही येथे आहे. वराह गुहेत विष्णुच्या वराह व वामन या अवतारांचे दर्शन घडते. 

📕सातव्या शतकातील महिषासूर मर्दिनी गुहा कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. येथून १४ किमीवर क्रोकोडाईल पार्क व सर्पोद्यानही आहे.
 
              (लेखिका_शामला देशपांडे)

राज्य सरकार स्थापणार ‘निसर्ग पर्यटन विकास मंडळ’


📕राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील निसर्ग पर्यटनास चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

📕या मंडळाच्या माध्यमातून राज्यातील ४८ अभयारण्ये, ६ राष्ट्रीय उद्याने आणि ५८ वन्यजीव संरक्षित क्षेत्रांचा विकास केला जाणार आहे.

📕या मंडळाचे मुख्यालय नागपूर येथे वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राहाणार आहे.

📕राज्यातील विविध वन्यजीव क्षेत्राला दरवर्षी सुमारे १० लाख पर्यटक भेट देतात. (@spardhavishwa )

📕परंतु तेथे पर्यटकांसाठी मुलभूत पायाभूत सुविधा नसल्याने क्षमता असूनही पर्यटक मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ आदी राज्यांना पसंती देतात.

📕व्यावसायिक दृष्टिकोण ठेवून या क्षेत्राचा विकास केला तर भविष्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते त्यामुळे यासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंगळवार, २ जानेवारी, २०१८

2017 या वर्षातील महत्वाच्या घडामोडी

📕भारतीय नौदलात पायलट म्हणून नियुक्ती होणाऱ्या शुभांगी स्वरूप या पहिल्या महिला अधिकारी बनल्या आहेत. ‘मॅरिटाइम रेकनन्स एअरक्राफ्ट’चे सारथ्य मूळच्या उत्तर प्रदेशच्या असलेल्या शुभांगी करतील. याव्यतिरिक्त पहिल्यांदाच तीन महिला अधिकाऱ्यांची नौदलाची उपशाखा असणाऱ्या ‘नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्टरेट’ विभागात नियुक्ती झाली आहे.

📕भारताने या वर्षात कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारांमध्ये आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. भारताची एकाच वेळी दोन्ही प्रकारांमध्ये अव्वल स्थान पटकावण्याची ही पहिली वेळ आहे. त्याचबरोबर अंधांसाठी असलेला टी-२० विश्वचषक वर्ल्डकप यंदा भारतीय टीमने जिंकला.

📕भारताच्या किदांबी श्रीकांतने बॅडमिंटनमध्ये एका वर्षात चार सुपर सिरीज जिंकण्याचा पराक्रम करत इतिहास घडवला. श्रीकांत इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि फ्रान्स या देशांमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये अजिंक्य ठरला.

📕फुटबॉल विश्वकपचे आयोजन क्रिकेटवेड्या भारतात होणे, ही कल्पनाच भन्नाट होती आणि ती कल्पनाही २०१७ने साकार करून दाखवली. यंदा भारतात अंडर-१७ फिफा वर्ल्डकप रंगला आणि देशभरातील तब्बल १३.५ लाख लोकांनी या विश्वचषकाचा आनंद लुटला. हा फुटबॉल विश्वचषक जरी भारताला जिंकता आला नसला तरी, केवळ यजमानपद मिळाल्याने भारतीय तरुणाईचा आनंद गगनात मावेनासा झाला.(@spardhavishwa)

📕ऑगस्ट २०१७मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतातील मुस्लीम महिलांना दिलासा देणारा एक निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच पैकी तीन न्यायमूर्तींनी मुस्लीम समाजात प्रचलित असलेली ट्रीपल तलाकची पद्धत घटनाबाह्य असल्याचा निर्णय दिला. सरकारने ही पद्धत पूर्णपणे बंद करण्याऐवजी कायदा करेपर्यंत सहा महिने त्यावर बंदी घालावी, असे मत इतर दोन न्यायमूर्तींनी दिले. केंद्रीय न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी २८ डिसेंबर २०१७ रोजी संसदेत तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणारे विधेयक मांडले आणि लोकसभेने ते विधेयक पास करत आता राज्यसभेत मांडण्यात येणार आहे.

📕तृतीयपंथीयांचे सक्षमीकरण व्हावे, या दृष्टीने या वर्षात अनेक प्रयत्न झाले. भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर न्यायाधीश म्हणून पश्चिम बंगालच्या ज्योइता मोंडल यांची नियुक्ती झाली. ‘तामिळनाडू युनिफॉर्म सर्व्हिसेस रिक्रूटमेंट बोर्ड’च्या निर्णयाला तामिळनाडूच्या प्रीतिका अश्नी यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्या त्यानंतर पहिल्या पोलीस उपनिरीक्षक बनल्या. तसेच भारतात पहिल्यांदाच कोचीच्या मेट्रोमध्ये २३ ट्रान्सजेंडरना एकाच वेळी नोकरी देण्यात आली.

सोमवार, १ जानेवारी, २०१८

विजय गोखले भारताचे नवे परराष्ट्र सचिव


📕भारत-चीनदरम्यान डोकलामवरुन उद्भवलेला तिढा यशस्वीपणे सोडविणारे विजय केशव गोखले यांची भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

📕पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या कॅबिनेट नियुक्ती समितीने विजय गोखले यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केल्याचे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

📕गेल्या तीन वर्षांपासून परराष्ट्र सचिवपद सांभाळत असलेले एस. जयशंकर यांच्या जागी विजय गोखले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

📕
परराष्ट्र सचिवपदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो. पण जयशंकर यांना गेल्या वर्षी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. जयशंकर २८ जानेवारी रोजी पदमुक्त होतील.

📕भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेले विजय गोखले हे दुसरेच मराठी अधिकारी आहेत.

📕यापूर्वी रामचंद्र दत्तात्रय साठे यांनी ९ नोव्हेंबर १९७९ ते ३० एप्रिल १९८२ दरम्यान चरण सिंह आणि इंदिरा गांधी पंतप्रधान असताना परराष्ट्र सचिवपद भूषविले आहे.(@spardhavishwa)

📕दिल्ली विद्यापीठातून इतिहासात एम. ए. केल्यानंतर विजय गोखले १९८१ साली भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झाले. 

📕विजय गोखले मलेशियात जानेवारी २०१० ते ऑक्टोबर २०१३ दरम्यान भारताचे उच्चायुक्त होते. ऑक्टोबर २०१३ ते जानेवारी २०१६ दरम्यान ते जर्मनीत भारताचे राजदूत होते. 

📕जानेवारी २०१६ ते ऑक्टोबर २०१७ दरम्यान चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.