📕गिनीज वर्ल्ड रेकॉड्सच्या निकषांनुसार आसाम या राज्यातील ब्रम्हपुत्रा नदीवरील ‘माजुली’ बेट हे जगातील सर्वात मोठे नदीवरील बेट ठरले आहे.
📕या आधी क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असणा-या ब्रझिलच्या ‘माराजी’ बेटास मागे टाकून माजुली बेटाने हा विक्रम नोंदवला आहे.
📕आसाममधील ब्रम्हपुत्रा नदीमध्ये हे बेट आहे. माजोलीचा अर्थ होतो की दोन समांतर नद्यांमधला प्रदेश.
📕बेटाच्या उत्तरेस ब्रम्हपुत्रेची उपनदी सुबानसिरी आहे. दक्षिणेस ब्रम्हपुत्रा आणि खेरकानिया, सुली या नद्या आहेत.
📕ब्रह्मपुत्रा व तिच्या उपनद्या विशेषतः लोहित यांनी मार्ग बदल्याने हे बेट निर्माण झाले आहे. बेटावर १४४ खेड्यांमध्ये दीड लाखाच्या वर लोकसंख्या वास्तव्यास आहे.( @spardhavishwa )
📕बेटावर १४४ खेड्यांमध्ये दीड लाखाच्या वर लोकसंख्या वास्तव्यास आहे. माजुली बेट हे दुर्मीळ पक्षी, पाणी व वनस्पतींचे ठिकाण आहे. स्थलांतरित पक्ष्यांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या बेटास जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी युनोस्कोने नामनिर्देशित केले होते.