बुधवार, ३ जानेवारी, २०१८

राज्य सरकार स्थापणार ‘निसर्ग पर्यटन विकास मंडळ’


📕राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील निसर्ग पर्यटनास चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

📕या मंडळाच्या माध्यमातून राज्यातील ४८ अभयारण्ये, ६ राष्ट्रीय उद्याने आणि ५८ वन्यजीव संरक्षित क्षेत्रांचा विकास केला जाणार आहे.

📕या मंडळाचे मुख्यालय नागपूर येथे वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राहाणार आहे.

📕राज्यातील विविध वन्यजीव क्षेत्राला दरवर्षी सुमारे १० लाख पर्यटक भेट देतात. (@spardhavishwa )

📕परंतु तेथे पर्यटकांसाठी मुलभूत पायाभूत सुविधा नसल्याने क्षमता असूनही पर्यटक मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ आदी राज्यांना पसंती देतात.

📕व्यावसायिक दृष्टिकोण ठेवून या क्षेत्राचा विकास केला तर भविष्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते त्यामुळे यासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.