गुरुवार, २१ डिसेंबर, २०१७

डोनाल्ड ट्रम्पना झटका ! जेरुसलेम वाद ; भारतासह 100 हून अधिक देशांचं विरोधात मतदान 


_संयुक्त राष्ट्रे - जेरुसलेमला इस्त्राईलच्या राजधानीची मान्यता देण्याच्या निर्णयावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना संयुक्त राष्ट्राकडून जोरदार झटका मिळला आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत गुरुवारी भारतासहीत 100 हून अधिक देशांनी अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रचे सदस्य राष्ट्र जेरुसलेमला इस्त्राईलची राजधानी म्हणून मान्यता दिलेल्या प्रस्तावाविरोधात मतदान केले आहे.

_दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रस्तावाविरोधात मतदान करणा-या देशांना अनुदातान कपात करण्याची धमकीदेखील दिली होती. परिणामी, काही देशांनी या प्रकरणातून स्वतःला अलिप्त ठेवले आहे.

_संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावाचे एकूण 128 देशांनी समर्थन केले. तर दुसरीकडे 9 देशांनी या प्रस्ताविरोधात मतदान केले आहे आणि 35 देश अलिप्त राहिलेत. 

_जेरुसलेम प्रकरणामुळे अमेरिका जागतिक स्तरावर एकटा पडला असला तरीही  पश्चिमी व अरब देशांच्या मैत्रिपूर्ण संबंध असलेल्या देशांनीही अमेरिकेच्या पक्षात मतदान करत त्याला एकटं पडण्यापासून वाचवलं.

_डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरूसलेमला इस्राईलची राजधानी म्हणून मान्यता देत असल्याचं जाहीर केलं होतं. 

_डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वादग्रस्त निर्णयामुळे मध्यपूर्वेत तसंच जगात इतर ठिकाणी व्यापक निदर्शनं होण्याची भीती अरब नेत्यांनी व्यक्त केली होती.