मंगळवार, २६ डिसेंबर, २०१७

पाकिस्तानच्या हद्दीत घुसून 6 सैनिकांचा खात्मा


_श्रीनगर - पाकिस्तानी सैनिकांकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे भारतीय लष्कराने सडेतोड प्रत्युत्तर दिले असून, भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सहा पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला. 

_सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय जवान पुन्हा एकदा पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्याचे स्पष्ट झाले आहे.

_पाकिस्तानी सैन्याकडून सीमेवर 23 डिसेंबरला शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेल्या गोळीबारात चार भारतीय जवान हुतात्मा झाले होते.

_या हुतात्मा जवानांमध्ये महाराष्ट्रातील एका जवानाचा समावेश होता. भारतीय लष्कराने या हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करून पाक सैनिकांचा खात्मा केला.

_प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) रावळकोट येथे भारतीय जवानांनी ही कारवाई केली. भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बलूच रेजिमेंटच्या सहा सैनिकांना ठार मारले.

_यापूर्वी भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.