गुरुवार, २१ डिसेंबर, २०१७

२०२२ राष्ट्रकुल खेळांचं यजमानपद बर्मिंगहॅमकडे

_दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहराने आर्थिक अडचणींचं कारण देत २०२२ साली होणाऱ्या राष्ट्रकुल खेळाचं यजमानपद भूषवण्यात नकार दिला.

_नकार दिल्यानंतर, बर्मिंगहॅम शहराला या स्पर्धेचा मान देण्यात आलेला आहे. डर्बनने माघार घेतल्यानंतर बर्मिंगहॅम या एकमेव शहराने यजमानपद भूषवण्यासाठी आपला प्रस्ताव सादर केला होता.

_यावरुन राष्ट्रकुल क्रीडा प्राधिकरणाने २०२२ साली होणाऱ्या स्पर्धांच्या यजमानपदाचे हक्क बर्मिंगहॅमला दिले आहेत.

_याआधी २०१४ साली ग्लास्गो आणि त्याआधी २००२ साली मँचेस्टर शहराने राष्ट्रकुल स्पर्धांच्या यजमानपदाचा मान भूषवला होता.

_हा मान आपल्याकडे घेण्यासाठी बर्मिंगहॅम शहरातील स्थानिक प्रशासनाला आपण या स्पर्धेच्या यजमानपदातून माघार घेणार नाही याची हमी द्यावी लागणार आहे. 

_ या स्पर्धेसाठीचा अंदाजे ७५ टक्के खर्च हा बर्मिंगहॅम स्थानिक प्रशासनाला करावा लागणार असून उर्वरित २५ टक्के खर्च हा राष्ट्रकुल समिती करणार आहे. 

_बर्मिंगहॅम शहराआधी दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन शहराला यजमानपदाचा मान देण्यात आला होता. (@spardhavishwa)

_२०१८ साली ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल स्पर्धा रंगणार आहेत.