अभिनेत्री रेखा आणि अमृता सुभाष यांना स्मिता पाटील स्मृती पुरस्कार प्रदान
_पहिलावहिला मानाचा ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१७’ ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना आणि पहिला ‘स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार २०१७’ अभिनेत्री अमृता सुभाष यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
_शनिवारी दिनानाथ नाट्यगृहात पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात ज्येष्ठ संगीतकार कल्याणजी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
_स्मिता पाटील यांची कामगिरी आणि त्यांच्या आठवणींना स्मरुन चाहत्यांनी एकत्र येऊन या वर्षीपासून पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला होता.