बुधवार, २० डिसेंबर, २०१७

Ramnath Goenka Excellence in journalism awards :

_देशातील २७ उत्कृष्ट पत्रकारांचा ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नलिझम अवॉर्डस २०१६’ ने आज गौरव करण्यात आला.

 हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा नवी दिल्लीत पार पडला. यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

_एक्स्प्रेस वृत्तसमूहाकडून त्यांचे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ २००६ साली या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली.

_मानचिन्ह आणि प्रत्येकी १ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

_पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

प्रिंट विभाग ः 

जम्मू आणि काश्मीर, ईशान्य भारतातील बातमीदारी ः अभिषेक सहा (हिंदुस्तान टाइम्स)

हिंदी ः राहुल कोटियाल (सत्याग्रह डॉट कॉम)

प्रादेशिक भाषा ः रेश्मा संजीव शिवडेकर (लोकसत्ता)

पर्यावरण बातमीदारी ः जिमी फिलीप (दीपिका डेली)(spardhaviswa)

अनकव्हरिंग इंडिया इन्व्हिजिबल ः एस. व्ही. राजेश (मल्याला मनोरमा)

बिझनेस आणि इकॉनॉमिक जर्नालिझम ः उत्कर्ष आनंद (द इंडियन एक्स्प्रेस)

राजकिय बातमीदारी ः मुझामिल जलील (द इंडियन एक्स्प्रेस)

खेळ पत्रकारिता : कैसर मोहम्मद अली (आउटलुक)

ऑन दि स्पॉट रिपोर्टिंग ः शुभाजित रॉय (द इंडियन एक्स्प्रेस)

शोध बातमीदारी ः रितू सरिन, पी. व्ही. अय्यर आणि जय मुजूमदार (द इंडियन एक्स्प्रेस)

__(सौजन्य_लोकसत्ता)