रविवार, १७ डिसेंबर, २०१७

राष्ट्रकुल स्पर्धेत सुशील कुमार आणि साक्षी मलिकची सुवर्ण कामगिरी


_जोहान्सबर्ग येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय कुस्तीपटूंनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली आहे. 

_भारताचा कुस्तीपटू सुशीलकुमार याने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत आपली चमक पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. तर दुसरीकडे कुस्तीपटू साक्षी मलिक हिनेही आपला सुवर्णपदक पटकावत महिला कुस्तीपटूंचे उत्तम प्रतिनिधित्व केले आहे. 

_साक्षीने ६२ किलो वजनी गटात फ्रीस्टाईलमध्ये न्यूझिलंडच्या तायला तुआहिने फोर्ड हिचा १३-२ असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.

_साक्षीबरोबरच अन्य महिला कुस्तीपटूंनीही धमाकेदार कामगिरी करत देशाचे नाव उंचावले आहे.