बुधवार, २० डिसेंबर, २०१७

जगातील स्थलांतरितांत भारताचा पहिला क्रमांक

_परदेशातील स्थलांतरितांच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर असून एकूण १.७ कोटी भारतीय लोक परदेशात वास्तव्य करीत आहेत. 

_त्यातील पन्नास लाख लोकांचे सध्याचे वास्तव्य आखातात आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे.

_मेक्सिको, रशिया, चीन, बांगलादेश, सीरिया, पाकिस्तान, युक्रेन या देशांचे लोक त्या खालोखाल मोठय़ा प्रमाणात स्थलांतरित म्हणून परदेशात आहेत. 

_त्यांची संख्या ०.६ ते १.१ कोटी आहे, असे २०१७ च्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर अहवालात म्हटले आहे.(@spardhavishwa)

_भारताखालोखाल मेक्सिकोचे १.३ कोटी लोक परदेशात स्थलांतरित म्हणून राहात आहेत.

_रशियाचे १.१ कोटी, चीनचे १ कोटी, बांगलादेशचे ०.७ कोटी, सीरियाचे ०.७ कोटी, पाकिस्तान व युक्रेनचे प्रत्येकी ०.६ कोटी लोक परदेशात स्थलांतरित म्हणून वास्तव्यास आहेत

_भारताचे ३० लाख नागरिक संयुक्त अरब अमिरातीत तर प्रत्येकी ०.२ कोटी नागरिक अमेरिका व सौदी अरेबियात आहेत.

_सध्या जगात २.५८ कोटी लोक त्यांचा जन्मदेश सोडून परदेशात राहात आहेत. त्यांचे प्रमाण इ.स. २००० पासून ४९ टक्के वाढले आहे. 

_आंतरराष्ट्रीय स्थलांतर हा चिंतेचा विषय असून, २०३० च्या शाश्वत विकास कार्यक्रमात त्याचा समावेश आहे. 

_२००० ते २०१५ दरम्यान उत्तर अमेरिकेत लोकसंख्यावाढीचा दर ४२ टक्के होता, तर ओशियानात तो ३१ टक्के होता. युरोपात २००० ते २०१५ दरम्यान स्थलांतराअभावी लोकसंख्या कमी झाली आहे.

____(सौजन्य_लोकसत्ता)