सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

जंगलकथा : पक्षीतीर्थ नांदूर मध्यमेश्वर

_नाशिक शहरापासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असलेलं नांदूर मध्यमेश्वर हे अप्रतिम असं पक्षीक्षेत्र आहे. 

_महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिमेकडील नाशिक जिल्ह्यत निफाड तालुक्यात खानगाव थडी इथे गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर १९११ सालच्या सुमारास एक दगडी बंधारा बनवण्यात आला. 

_गंगापूर आणि दारणा पाणसाठय़ातून सोडलं जाणारं पाणी या दगडी बंधाऱ्याच्या परिसरात साठायला लागून इथे पाण्याचा कायमस्वरूपी फुगवटा बनला. 

_या फुगवटय़ामुळे बनलेला जलाशय परिसर पक्ष्यांना उत्तम अधिवास पुरवत असल्याने हजारो पक्ष्यांनी या परिसरात मुक्काम करायला सुरुवात केली.

_नांदूर मध्यमेश्वर परिसरात गंगापूर आणि दारणेतून सोडलं जाणारं पाणी साठवलं जातं आणि ते पुढे कालव्यांतून शेतीसाठी वापरात आणलं जात. 

_या वाहत्या पाणी व्यवस्थेमुळे बाराही महिने उत्तम हिरवा अधिवास निर्माण झालेला इथे दिसून येतो

_महाराष्ट्राचं भरतपूर अशा विशेषणांनी दस्तुरखुद्द डॉक्टर सलीम अलींनी नावाजलेलं नांदूर  मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य आजही बऱ्यापैकी दुर्लक्षित म्हणता येऊ शकेल असंच आहे.

_नांदूर मध्यमेश्वर परिसरात अनेक नैसर्गिक बेटसदृश भाग बनले असून त्या परिसरात बहुतांश पाणवनस्पती आणि जलचर वास्तव्यास आल्याने समृद्ध जल अन्नसाखळी या परिसरात नांदते आहे. 

_कायम आणि स्थलांतरित अशा शेकडो प्रकारच्या पक्ष्यांनी गजबजणारा हा परिसर १९८६ साली अभयारण्याचा दर्जा देऊन संरक्षित केला गेला. @spardhavishwa

_सुमारे १०१ किलोमीटरचा परिसर महाराष्ट्र वन विभागाने संरक्षित करून नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्याची निर्मिती करण्यात आली

_रामायण काळात रामाने सीतेसाठी सुवर्ण मृगाची हत्या ज्या ठिकाणावर केली, त्याच जागेवर मध्यमेश्वरचे देऊळ उभे असल्याची आख्यायिका सांगितली जाते. 

_२५० वर्ष जुनं असलेलं मध्यमेश्वराचं देऊळ आणि  देवळाच्या दारातली नऊ फुटी दीपमाळ पारंपरिक बांधकामाचा नमुना आहे. 

_इथे झालेल्या नोंदीनुसार २३० हून जास्त प्रकारचे पक्षी या परिसरात आढळतात. यातील ८० हून जास्त प्रकारचे पक्षी स्थलांतरित प्रकारात गणले जातात. 

_स्थलांतरित पक्ष्यांमध्ये इथे गूस, गॉडवीट, फ्लेिमगोज, स्पूनबिल्स, विव्हर्स वगैरे मंडळी आहेत.

_चक्रवाक, तलवार बदक, लालसरी, चतुरंग, सुरय, कादंब, झोळीवाला, करकोचे, शराटी, तुतारी, क्रौंच, गल, चिलखे, कुरल, हरीण, चमचा बदक, बगळे, चांदवा, कमळपक्षी, पाणकोंबडी, मुग्धबलाक, खंडय़ा, ससाणा, पाणबुडी हे स्थानिक पक्षी बघायला मिळतात.

_नांदूर परिसरात सरडे, सुरळ्या, साप, मुंगूस यांची रेलचेल असून अनेकदा हे जीव उन्हात शेकताना किंवा नदीच्या काठावर दिसून येतात. 

_मध्यमेश्वर तलावाच्या परिसरात असलेल्या विरळ जंगलात निम, बाभुळ, विलायती चिंच, गावठी चिंच, मोह, आंबा, पांगारा वगैरे झाडं आहेत.

_नांदूर मध्यमेश्वर हे मौजमजेचं ठिकाण नसून पक्षी निरीक्षणासाठी उत्तम जागा आहे 

       _रुपाली पारखे (लोकरंग)