रविवार, २४ डिसेंबर, २०१७

#Year_End_2017_Special : _यंदाच्या वर्षी ‘या’ कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

1) शशी कपूर

_कपूर कुटुंबातील देखण्या चेहऱ्याचे आणि कलाविश्वाप्रती तत्परतेने झटणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे ४ डिसेंबरला प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

_ ते ७९ वर्षांचे होते. १९४० पासून त्यांनी बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत काम करायला सुरूवात केली होती.

_ त्यांनी आतापर्यंत ११६ चित्रपटांमध्ये काम केले असून त्यातील ६१ चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती.

_६० आणि ७० च्या दशकांत त्यांनी ‘जब-जब फूल खिले’, ‘कन्यादान’, ‘शर्मिली’, ‘आ गले लग जा’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘चोर मचाए शोर’, ‘दीवार’, ‘कभी-कभी’ आणि ‘फकिरा’ या सुपरहिट सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका वठवल्या होत्या.

2)गिरिजा देवी

_सुप्रसिद्ध ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांनीही २३ ऑक्टोबरला जगाच निरोप घेतला.

_बनारस घराण्याच्या शास्त्रीय गायिका असणाऱ्या गिरिजा देवी शास्त्रीय संगीताबरोबरच त्यांनी ‘ठुमरी’ या गाण्याच्या प्रकारात त्या पारंगत होत्या.

_ आपल्या याच गुणवैशिष्ट्यामुळे त्या ‘ठुमरीची राणी’ म्हणूनही ओळखल्या जात होत्या.

_गिरिजा देवी यांना १९७२ मध्ये पद्मश्री किताबाने त्यानंतर १९८९ मध्ये पद्मभूषणने तर २०१६ मध्ये पद्मविभूषण किताबाने गौरवण्यात आले होते.

3) राम मुखर्जी

_२२ ऑक्टोबरला अभिनेत्री राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जी यांचे निधन झाले.(spardhaviswa)

_चित्रपटसृष्टीमध्ये दिग्दर्शन, पटकथा लेखन आणि निर्मिती क्षेत्रात मुखर्जी यांनी आपली छाप सोडली होती.

_‘हम हिंदुस्तानी’, ‘लीडर’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. त्यांना कलेचा वारसा कुटुंबातूनच मिळाला होता.

_चित्रपट निर्माते शशाधर मुखर्जी हे राम मुखर्जी यांचे काका होते. ‘फिल्मालय स्टुडिओज’शी राम मुखर्जी यांचं अगदी जवळचे नाते होतं.

4)टॉम अल्टर

_अमेरिकन वंशाचे भारतीय अभिनेते टॉम अल्टर यांनी २९ सप्टेंबरला जगाचा निरोप घेतला.

_ १९७६ मध्ये धर्मेंद्र यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘चरस’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

_ त्यानंतर ‘शतरंज के खिलाडी’, ‘गांधी’, ‘क्रांती’, ‘बोस : द अनफरगॉटन हिरो’ आणि ‘वीर झारा’ या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारली.

_त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. तसेच, अनेक टीव्ही मालिकांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.

_ ‘जुगलबंदी’, ‘भारत एक खोज’, ‘घुटन’, ‘शक्तीमान’, ‘मेरे घर आना जिंदगी’, ‘यहाँ के हम सिकंदर’ यासारख्या मालिकांमधूनही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली.

5)रिमा लागु

_चित्रपटसृष्टीतील ‘ग्लॅमरस माँ’ अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रिमा यांच्या निधनाच्या बातमीने अनेकांनाच धक्का बसला होता.

_ रंगभूमी, मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिका अशा सगळीकडे समर्थ अभिनयाने आणि सहज वावराने आपली छाप सोडली होती.

_ ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि करारी अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या रिमा बऱ्याच वर्षांनंतर टेलिव्हिजनवर परतल्या होत्या.

_ मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमधूनही आघाडीच्या कलाकारांबरोबर त्यांनी काम केले होते. टेलीव्हिजनवरही हिंदी आणि मराठी दोन्हीकडे त्यांचा सारखाच दबदबा होता.

6) विनोद खन्ना

_हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘हॅण्डसम’ अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विनोद खन्ना यांनी २७ एप्रिलला या जगाचा निरोप घेतला.

- १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमातून विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती.

_त्यानंतर अनेक सिनेमात सहाय्यक अभिनेता आणि खलनायकाच्या भूमिका साकारत त्यांनी आपला ठसा उमटवायला सुरुवात केली.

_१९७१ मध्ये ‘हम तूम और वो’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा मुख्य अभिनेता म्हणून काम केले. विनोद खन्ना यांनी ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘अमर, अकबर, अँथनी’ या सिनेमांमधून आपल्यातील अभिनय गुण दाखवून दिले होते.

7) तारक मेहता

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या_मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. पण, या साऱ्याचा पाया रचला होता ते म्हणजे विनोदी लेखक, नाटककार तारक मेहता यांनी.

_१ मार्चला त्यांनी या जगाचा निरोप घेतला. तारक मेहता यांना २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

_‘दुनियाने उंधा चष्मा’ या सदरासाठी आणि अनोख्या लेखनशैलीसाठी तारक मेहता ओळखले जायचे.

_ ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील चंपकलाल गडा, जेठाभाई, दयाबेन यांसारख्या पात्रांना अजरामर करण्यामागे तारक मेहता यांच्या लेखणीचा मोठा हात आहे.

_ त्यांचे ‘नवूं आकाश नवी धरती’ आणि ‘कोथळामांथी खिलाडी’ ही गुजराती भाषेतील पुस्तकेही खूप गाजली.
     
          (संकलन_लोकसत्ता)