शुक्रवार, १५ डिसेंबर, २०१७

थोरांची समाधीस्थळे

💦थोरांची समाधीस्थळे💦

१) लखुजी जाधवराव (जिजाबार्इंचे वडील)-  सिंदखेड राजा

२) मालोजीराजे (शिवरायांचे आजोबा)-   इंदापूर, जि. पुणे

३) विठोजीराजे (शिवरायांचे चुलते)-   भातवडी

४) शहाजीराजे -   होदिगेरे, ता. कनकगिरी, जि. दावनगेरे (कर्नाटक)

५) जिजाबाई - पाचाड (रायगडाच्या पायथ्याला)

६) छत्रपती शिवाजी महाराज - रायगडावर

७) सईबाई (शिवरायांच्या पत्नी) - राजगड

८) पुतळाबाई व सोयराबाई (शिवरायांच्या पत्नी) - रायगड

९) संभाजीराजे (शिवरायांचे थोरले बंधू) - कनकगिरी, ता. गंगावटी, जि. कोप्पल

१०) छत्रपती संभाजी (शिवरायांचे थोरलेपुत्र) - वडू कोरेगाव

११) सखुबाई (शिवरायांच्या कन्या) - माळशिरस, जि. सोलापूर

१२) सूर्यराव काकडे (शिवरायांचे जवळचे मित्र)- साल्हेरच्या किल्ल्याजवळ.

१३) रामचंद्रपंत अमात्य(अष्टप्रधान मंडळातीलमंत्री)- पन्हाळगडाच्या पायथ्याशी

१४) मकूबाई (शिवरायांच्या भावजयी) - जिती,ता.करमाळा, जि. सोलापूर

१५) शिवरायांचे सेनापती नेताजी पालकर- तामसा, ता. हदगाव, जि. नांदेड

१६) धनाजी जाधव - वडगाव (कोल्हापूरजवळ)

१७) रामाजी पांगेरा - कन्हेरगड, ता. दिंडोरी, जि. नाशिक

१८) बाजी पासळकर आणि गोदाजी जगताप - (गाधवड, जि. पुणे)

१९) तानाजी मालुसरे आणि शेलारमामा - उमरळ

२०‹) रायबा (तानाजीचा मुलगा)-  पारगड

२१) बहिर्जी नाईक - भूपाळगड मौजे बाणूर, ता.आटपाटी, जि. सांगली

२२) हिरोजी फर्जंद आणि शिवरायांचे सावत्र भाऊ - परळी (रायगडाजवळ)

२३) शिवा काशिद - पन्हाळगड

२४) कान्होजी जेधे आणि जिवा महाला - कारी अंकवडे, ता. भोर, जि. पुणे

२५) मुरारबाजी देशपांडे -पुरंदर

२६) संभाजी कावजी - कोंडावळे, ता. मुळशी, जि. पुणे

२७) फिरंगोजी नरसाळा- संग्रामदुर्ग (चाकण) पुणे

२८) सिदोजी निंबाळकर - पट्टागड (संगमनेर)

२९) बाजी प्रभू व फुलाजी प्रभू - विशाळगड

३०) दत्ताजी जाधव (शिवरायांचे मामा बहादुरजीचे नातू) निलंगा येथे १६६५ साली. समाधीस्थळ सापडत नाही.

३१) जानोजी भोसले नागपूरकर - मु.पो. येडोळा, ता. तुळजापूर

३२) जानोजी निंबाळकर (तुळजाभवानी देवीचा दरवाजा यांच्याच नावाने आहे) - बीड

३३) जगदेवराव जाधवराव (जिजाबार्इंचा भाऊ बहादुरजीचा नातू व देऊळगावराजाचा कर्ता)- ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा, जि.सोलापूर

 ३४) नागोजी माने (म्हसवडकर)- सिंदखेडराजा 

३५) हिंमतबहाद्दर उदाजी चव्हाण - अणदूर, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद 

३६) अन्नूबाई (पहिल्या बाजीरावांच्या बहीण )- मु.पो. तुळजापूर, जि.उस्मानाबाद

३७) प्रतापराव गुजर - नेसरी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर 

३८) हंबिरराव मोहिते- तळबीड, ता. कराड, सातारा 

आज महाराष्ट्रातील ब-याच समाध्या जीर्ण अवस्थेत आहेत. काही ठिकाणी समाधी अस्तित्वातच नाहीत आणि ज्या आहेत त्याच्याकडे समाजाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. अशी थोरामोठ्यांची समाधीस्थळे पुढील पिढीला प्रेरणा  असतात. सर्वांत सुंदर समाधीस्थळ शहाजीराजांचे आहे. आपल्यापेक्षा कर्नाटकातील लोकांना हे लवकर समजावे हे विशेष आहे.